S M L

'त्या' नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचे आदेश, शार्प शुटर जंगलात दाखल!

प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिलेल्या आदेशाला उच्च न्यायालयाने ग्रिन सिग्नल दिल्यामुळे आता वाघिणीचा मृत्यू अटळ आहे

Updated On: Sep 8, 2018 09:31 PM IST

'त्या' नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचे आदेश, शार्प शुटर जंगलात दाखल!

भास्कर मेहेरे, यवतमाळ, 8 सप्टेंबर : जिल्ह्यातील राळेगावच्या जंगलात माणूस आणि वाघाचा संघर्ष सुरु आहे. नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचे आदेश मिळताच शार्प शुटर राळेगावच्या जंगलात दाखल झाले आहेत. एका बाजूला वाघीण इतरांसाठी मृत्यू बनून फिरतीय, तर दुसऱ्या बाजूला ती स्वतः बंदुकीच्या निशाण्यावर आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिलेल्या आदेशाला उच्च न्यायालयाने ग्रिन सिग्नल दिल्यामुळे, माणूस आणि निसर्गाच्या या संघर्षात वाघिणीचा मृत्यू अटळ आहे.

राळेगावच्या जंगलातील ज्या वाघीणीनं तेरा जणांचा जीव घेतला, त्या नरभक्षक टी-1 वाघिणीचा माग काढत मृत्यू पुढे सरसावतोय. यवतमाळच्या राळेगावातल्या जंगलातील नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचं फर्मान निघाल्यानंतर वन विभागाचे शार्प शूटर तिच्या शोधात जंगल पिंजून काढताहेत. वाघीणीची दहशत एवढी आहे की, परिसरातील गावकऱ्यांनी स्वतःला घरात कैद करून घेतल्याचं चित्र आहे.

याआधी वन विभागानं नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र, ती हाती लागली नाही. तिच्यावर विष प्रयोगही करण्यात आला पण तोही व्यर्थ गेला. अखेरीस तिला ठार मारण्याचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिलेत. आणि त्यांच्या या आदेशाला हायकोर्टानंही हिरवा कंदील दिलाय.

वाघीणीला मारण्याच्या आदेशानं वन्यजीव प्रेमी मात्र नाराज झाले आहेत. वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करावं अशी त्यांची मागणी आहे. राळेगावच्या जंगलात एका बाजूला वाघीण मृत्यू बनून फिरतीय, तर दुसऱ्या बाजूला या बंदुकांच्या निशाण्यावर वाघीण आहे. माणूस आणि निसर्गाच्या या संघर्षात वाघिणीचा मृत्यू अटळ आहे.

 VIDEO : भारतीय वायूदलाच्या शिरपेचात मानाचा तुरा, साद्य केली ही किमया

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 8, 2018 09:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close