S M L

कीटकनाशक मृत्यूप्रकरणी यवतमाळ कृषी कार्यालयात मनसेचा राडा

यवतमाळ जिल्ह्यातल्या कृषी अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये मनसेनं तोडफोड केलीय. कीटकनाशक फवारणी मृत्युप्रकरणाचा निषेध करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांकडून ही तोडफोड करण्यात आली.

Chandrakant Funde | Updated On: Oct 11, 2017 06:26 PM IST

कीटकनाशक मृत्यूप्रकरणी यवतमाळ कृषी कार्यालयात मनसेचा राडा

यवतमाळ, 11ऑक्टोबर : यवतमाळ जिल्ह्यातल्या कृषी अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये मनसेनं तोडफोड केलीय. कीटकनाशक फवारणी मृत्युप्रकरणाचा निषेध करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांकडून ही तोडफोड करण्यात आली. आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी कृषी अधिक्षकांची खुर्चीही कार्यालयाबाहेर फेकली. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात हे खळ्ळखट्याक स्टाईल आंदोलन करण्यात आलं. या तोडफोडीनंतर पोलिसांनी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांचासह 10 ते 12 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

दरम्यान, काल सांगलीमध्येही मनसे कार्यकर्त्यांकडून परप्रांतियांना मारहाण करण्यात आली होती. राज ठाकरेंच्या रेल्वेविरोधातील 5 ऑक्टोबरच्या मुंबई मोर्चाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर मनसे संघटनेत एक प्रकारची नवचैतन्य निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय. त्याचाच परिपाक म्हणून राज्यभरातही आता मनसे कार्यकर्ते सक्रिय झाल्याचं बघायला मिळतंय. मुंबईतही आज राज ठाकरेंनी बीएमसी आयुक्तांची भेट घेऊन फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी केलीय.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2017 06:11 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close