News18 Lokmat

दुचाकींची समोरासमोर धडक, दोन जण जागीच ठार

राळेगाव शहारापासून 3 किमी अंतरावर यवतमाळ मार्गावरील बस अगरासमोर दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली

News18 Lokmat | Updated On: Aug 13, 2018 04:41 PM IST

दुचाकींची समोरासमोर धडक, दोन जण जागीच ठार

यवतमाळ, 13 आॅगस्ट : राळेगाव शहारापासून 3 किमी अंतरावर यवतमाळ मार्गावरील बस अगरासमोर दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली.  यात 2 जण जागीच ठार झाले तर 3 जण गंभीर जखमी झाले. मृतामध्ये योगेंद्रकुमार मौर्य,  सुरज भीमराव ताकसा यांचा समावेश आहे.

दोन्ही मृतक उत्तर प्रदेशातील असून ते कामानिमित्त गेल्या काही दिवसांपासून राळेगावात मुक्कामी होते. काही कामानिमित्याने ते मोटार सायकलने कळंबकडे जात असताना समोरून येणाऱ्या मोटार सायकल ने धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की दोघे जण जागीच ठार झाले तर 3 गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी यवतमाळला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 13, 2018 04:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...