19 शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या कीटकनाशकांची सर्रास विक्री सुरूच !

19 शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या कीटकनाशकांची सर्रास विक्री सुरूच !

राज्य सरकारने या प्रकरणातील मृतांच्या वारसांना २ लाखांची मदत जाहीर केली आहे पण ही मदत तोकडी असल्याच सांगत असल्याचं विरोध केलाय.

  • Share this:

03 आॅक्टोबर : यवतमाळ जिल्ह्यात घातक कीटकनाशकाच्या विषबाधेमुळे मृतांचा आकडा १९ शेतकऱ्यांवर पोहोचलाय. राज्य सरकारने या प्रकरणातील मृतांच्या वारसांना २ लाखांची मदत जाहीर केली आहे पण ही मदत तोकडी असल्याच सांगत असल्याचं विरोध केलाय. एवढंच नाहीतर 19 शेतकऱ्यांचा जीव घेणारं कीटकनाशकाची सर्रासपणे विक्री सुरू आहे.

जास्त उत्पादन देणाऱ्या बीटी कापसाची विदर्भात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पण या वर्षी निकृष्ठ बियाणे शेतकऱ्यांकडे पोहचल्याने कपाशीवर बोंड अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याच सांगितलं जातंय. पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातील लोकांनी दिलेले कीटकनाशक वापरले. पण या कीटकनाशकामुळे माणसांवरच त्याचा घातक परिणाम झाला.

राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून कुठल्याही सुचना शेतकऱ्यांना या कीटकनाशकांच्या वापरासंदर्भात देण्यात आल्या नव्हत्या.

घातक रसायनांपासून तयार करण्यात आलेल्या कीटकनाशकाच्या विषबाधेतून यवतमाळ जिल्ह्यातील १९ शेतकऱ्यांचा बळी गेल्यानंतरही प्रोफेस, पोलो आणि पोलीस या कीटकनाशकांची सर्रास विक्री सुरू आहे. केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने या जीवघेण्या कीटकनाशकांना मंजुरी दिली आहे. यवतमाळच्या घटनेनंतर तरी या कीटकनाशकांवर बंदी येणार का हा प्रश्न मात्र कायम आहे.

दरम्यान, कीटकनाशके डोळ्यावाटे, श्वसनमार्गाने आणि खाण्यातून शेतकरी आणि शेतमजुरांच्या पोटात गेल्याने त्यांचा बळी गेल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांनी सांगितलं आहे.

मुंबईत रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीत ठार झालेल्या मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत आणि यवतमाळमधील कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना दोन लाखांची  मदत हा अन्याय असल्याची शेतकरी सुकाणु समितीने सांगून आंदोलनाची हाक दिली आहे.

आधीच संकटात असणाऱ्या विदर्भातील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आयुष्यात घातक किटकनाशकांनी आणखी विघ्न निर्माण केले आहे. मृत शेतकऱ्यांच्या वारसांना दोन लाखांची मदत जाहीर करून सरकार या प्रकरणात सोपस्कार पार पाडू इच्छिते पण हे घातक कीटननाशकं बाजारात सर्रास मिळत असल्यामुळे सरकार या प्रकरणात खरंच गंभीर आहे हा प्रश्नही उपस्थित केला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2017 07:08 PM IST

ताज्या बातम्या