S M L

धक्कादायक! फवारणी करताना 123 जणांना विषबाधा, 6 शेतकरी मृत्यूच्या उंबरठ्यावर

कपाशीच्या पिकामधील तण आणि बोण्ड अळीच्या आक्रमणाला रोखण्यासाठी शेतकरी जहाल कीटकनाशकांची फवारणी करत असतांना १२३ शेतकऱ्यांना विषबाधा झाली.

Updated On: Sep 12, 2018 11:49 AM IST

धक्कादायक! फवारणी करताना 123 जणांना विषबाधा, 6 शेतकरी मृत्यूच्या उंबरठ्यावर

भास्कर मेहरे, प्रतिनिधी

यवतमाळ, 12 सप्टेंबर : कपाशीच्या पिकामधील तण आणि बोण्ड अळीच्या आक्रमणाला रोखण्यासाठी शेतकरी जहाल कीटकनाशकांची फवारणी करत असताना १२३ शेतकऱ्यांना विषबाधा झाली. त्यापैकी २३ शेतकरी रुग्णांवर यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्यापैकी ६ रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहे.

शेतकऱ्यांच्या या विषबाधेमुळे आरोग्ययंत्रणा हादरून गेली आहे. त्यामुळे आता विष फवारणी दरम्यान विशेष खबरदारीचं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. गेल्या वर्षीही यवतमाळ जिल्ह्यात ९०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना फवारणी दरम्यान विषबाधा झाली होती. तर २२ शेतकरी आणि शेतमजुरांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे प्रशासनही हादरून गेलं होतं.

यावर्षी तशी परिस्थितीत उद्भवू नये यासाठी सुरुवातीपासूनच खबरदारी घेण्यात आली होती. रकुशी विभागालाही तशा सूचना देण्यात आल्या होत्या आणि संरक्षक किटचं वाटप करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र तरीसुद्धा या वर्षी जुलैपासून आतापर्यंत १२३ शेतकऱ्यांना फवारणी दरम्यान विषबाधा झाली आहे. त्यापैकी २३ शेतकऱ्यावर वसंतराव नाईक वैद्यकीय रुग्णालयात अजूनही उपचार सुरू आहेत. तर यातले 6 शेतकरी गंभीर अवस्थेमध्ये आहे.

फवारणी करताना या गोष्टींची काळजी नक्की घ्या

Loading...

- फवारणी दरम्यान शेतकऱ्याने विशेष काळजी घ्यायला पाहिजे. अनेक प्रकारची कीटकनाशकांची मिश्रणं तयार करू नये.

- फवारणी किट न वापरणं हे अतिशय धोकादायक आहे.

- त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेऊन प्रमाणापेक्षा जास्त पंप फवारे करू नये, असं आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आलं आहे.

 

घरबसल्या असा बदला आधार कार्डवरील फोन नंबर आणि पत्ता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 12, 2018 11:40 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close