हवामान लहरी की हवामान विभाग लहरी?,एकच माहिती निव्वळ कॉपी पेस्ट ?

हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणाऱ्या हवामान खात्याकडून एकच अंदाज दोनदा दिल्याची घटना समोर आलीये

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 15, 2017 04:05 PM IST

हवामान लहरी की हवामान विभाग लहरी?,एकच माहिती निव्वळ कॉपी पेस्ट ?

15 जुलै : हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणाऱ्या हवामान खात्याकडून एकच अंदाज दोनदा दिल्याची घटना समोर आलीये. त्यामुळे  हवामान लहरी की हवामान विभाग लहरी? असा प्रश्न निर्माण झालाय.

यंदा अमूक अमूक पाऊस होणार, इथं इतका पाऊस पडणार तिथे तितका पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्याची जबाबदारी भारतीय हवामान विभागाची आहे. हवामान विभागाच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना शेती कामाचं नियोजन करण्यास सोईचं होतं. पण नेहमी हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला अंदाज फोल ठरत असल्याचं समोर आलं. आता तर भरात भर म्हणजे हवामान विभागाचं महाराष्ट्रासाठीचं विशेष बुलेटिन निव्वळ कारकूनी ठरलं.

हवामान विभागाने 13 जुलै 2017 रोजी पावसाचा अंदाज वर्तवला होता. पण हाच अंदाज सेम टू सेम 18 जुलै 2017 पर्यंत एकच होता. फक्त सहा दिवसांसाठी हवामान विभागानं हा अंदाज वर्तवलाय. एकच अंदाजात स्पष्टता नसल्यानं हवामान विभागाच्या अंदाजावर शेतकऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केलीय.

एवढंच नाहीतर हवामान खात्याचा अंदाज चुकल्यामुळे बीडमध्ये एका शेतकऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा मागणीच केलीये.

हे पण वाचा

Loading...

भारतीय हवामान खात्याचा पावसाचा 'अंदाज' का चुकतो ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2017 04:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...