पनीर बटरऐवजी पाठवलं बटर चिकन, Zomatoला 55 हजारांचा दंड

Zomatoला न्यायालयानं 55 हजारांचा दंड ठोठावला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 6, 2019 04:01 PM IST

पनीर बटरऐवजी पाठवलं बटर चिकन, Zomatoला 55 हजारांचा दंड

पुणे, 06 जुलै : ऑनलाईन फूड डिलिव्हरी हा पर्याय सध्या अनेक जण वापरतात. बऱ्याच वेळा अनेकांना चुकीच्या ऑर्डरचा देखील सामना करावा लागतो. तुम्ही उपवासाच्या दिवशी खाणं ऑर्डर केलं आणि त्या दिवशी तुम्हाला चिकन पाठवलं तर काय कराल? शिवाय, एकदा ऑर्डर रद्द केल्यानंतर तिच चूक पुन्हा झाली तर? नागपुरातील वकील शनमुख देशमुख यांना असाच अनुभव आला. उपवास असल्यानं त्यांनी Zomatoवरून पनीर बटरची ऑर्डर दिली. पण, त्याऐवजी Zomatoनं बटर चिकन पाठवलं. त्यांनी त्याबाबत तक्रार केल्यानंतर ऑर्डर रद्द करून पुन्हा पाठवण्याचं रेस्टारंटनं कबुल केलं. पण, यावेळी देखील बटर चिकन पाठवलं गेलं. त्यामुळे पेशानं वकील असलेल्या शनमुख देशमुख यांनी ग्राहक न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यांना त्या ठिकाणी न्याय देखील मिळाला.

कर्नाटकातील काँग्रेस – जेडीएस सरकार अडचणीत; 8 आमदारांचा राजीनामा

काय आहे प्रकरण

शनमुख देशमुख हे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये वकिली करतात. 31 मे 2018 रोजी देशमुख पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी उपवास असल्यानं प्रीत पंजाबी स्वाद हॉटेलमधून पनीर बटरची ऑर्डर दिली. पण, त्याऐवजी बटर चिकन पाठवलं गेलं. त्यांनी याबाबत Zomatoच्या डिलिव्हरी बॉयला सांगितलं. तेव्हा त्यानं आम्ही केवळ डिलिव्हरी करण्याचं काम करतो असं उत्तर दिलं. त्यामुळे देशमुख यांनी हॉटेलला फोनकरून तक्रार केली. तेव्हा हॉटेलनं देखील माफी मागत ऑर्डर बदलून देण्याचं मान्य केलं. त्यानंतर देखील पुन्हा तिच हॉटेलकडून झाली. त्यामुळे शनमुख देशमुख ग्राहक न्यायालयात दाद घेत 6 लाखांची मागणी केली.

स्नान करताना महिलेचा व्हिडीओ तयार करणारा पोलीस गजाआड

Loading...

Zomatoला दंड

ग्राहक न्यायालयानं शनमुख देशमुख यांच्या तक्रारीची दखल घेत Zomatoला 55 हजारांचा दंड ठोठावला. Zomatoच्या गुरूग्राममधील हेडऑफिस अथवा रेस्टारंटला हा दंड 45 दिवसामध्ये देण्याचा आदेश दिला. शिवाय दंड देण्यास उशीर झाल्यास दंडावर 10 टक्के व्याज द्यावं लागणार आहे. न्यायालयानं निर्णय देताना निष्काळजीपणासाठी 50 हजार आणि मानसिक त्रास देण्यासाठी 5 हजारांचा दंड ठोठावला आहे.

Zomato म्हणतं आम्हाला काही माहित नाही

या प्रकरणाबाबत Zomatoचे Regional Manager विपुल सिन्हा यांना विचारल्यानंतर त्यांनी मात्र याबाबत काहीही माहिती नसल्याचं सांगितलं. तर, Zomatoच्या प्रवक्त्यांशी कोणताही संपर्क झालेला नाही.

VIDEO: मालाडमध्ये पुन्हा भिंत कोसळली, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 6, 2019 03:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...