प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचं निधन

News18 Lokmat | Updated On: Sep 27, 2018 09:16 PM IST

प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचं निधन

पुणे, 27 सप्टेंबर : प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचं निधन झालं. त्या 51 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या निमोनियामुळे त्रस्त होत्या. आज संध्याकाळी पुण्यात  अखेरचा श्वास घेतला.

कविता महाजन यांच्या भिन्न, कुहू, ब्र या सारख्या कांदबरी प्रसिद्ध झाल्या होत्या. कविता महाजन  यांचा जन्म याच महिन्यातील 5 सप्टेंबर रोजी १९६७ मध्ये नांदेड इथं झाला होता. मराठी लेखिका आणि कवयित्री म्हणून त्यांची ओळख होती.

कविता महाजनांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयमध्ये झाले. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्या मराठी साहित्य या विषयाच्या एम.ए. होत्या.

कविता महाजन यांची साहित्य संपदा

अंबई : तुटलेले पंख    

Loading...

आग अजून बाकी आहे    

आगीशी खेळताना        

आबा गोविंदा महाजन : बालसाहित्य आकलन आणि समीक्षा    

कुमारी माताअनुवादित पुस्तक    

कुहू     

कुहू (लहान मुलांसाठी)    लेखसंग्रह    

ग्राफिटीवॉल    

बकरीचं पिल्लू : जंगल गोष्टी, पाच पुस्तकांचा संग्रह    

बालसाहित्य        

जोयानाचे रंग    बालसाहित्य    

ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम    

तत्पुरुष    काव्यसंग्रह        

तुटलेले पंख (संपादित: भारतीय लेखिका पुस्तक मालिका)    

लेखसंग्रह        

धुळीचा आवाज    काव्यसंग्रह        

पूल नसलेली नदी (संपादित : भारतीय लेखिका पुस्तक मालिका)    कथा संग्रह        

म्रृगजळीचा मासकाव्यसंग्रह        

ब्र    कादंबरी    

भिन्न    कादंबरी    

रजई (इस्मत चुगताई)    लघुकथासंग्रह        

वारली लोकगीते आदिवासी लोकगीतांचे संकलन आणि संपादन    साहित्य अकादमी    

वैदेही यांच्या निवडक कथा (संपादित : भारतीय लेखिका पुस्तक मालिका)कथा संग्रह

(जानकी श्रीनिवास मूर्ती यांच्या कथांचा अनुवाद. अनुवादक : उमा कुलकर्णी)        

समतोल खा सडपातळ रहापाकशास्त्र

समुद्रच आहे एक विशाल जाळं कवितासंग्रह

पुरस्कार

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार (इ.स. २००८)

कवयित्री बहिणाई पुरस्कार (इ.स. २००८)

साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार (रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादाला)(इ.स. २०११)

मुख्याध्यापिका शशिकलाताई आगाशे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय बालवाड्मय पुरस्कारासाठी ‘जोयनाचे रंग’ या कथासंग्रहासाठी (२०१३)

हेही पाहा !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2018 09:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...