News18 Lokmat

VIDEO : जगातला सगळ्यात मोठा बोन्साय संग्रह आणि तोही पुण्यात! 'बोन्साय लेडी'चा नवा विक्रम

आता पावसाळ्यामध्ये कोणती झाडं वाढवायची याचं प्लॅनिंग तुम्ही करत असाल. घराच्या अंगणात या पावसाच्या दिवसांत झाडं लावली तर ती चांगली वाढतात. पण ज्यांच्याकडे एवढी जागा नसेल आणि तरीही झाडांची खूप आवड असेल तर एक छान पर्याय आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 11, 2019 02:50 PM IST

VIDEO : जगातला सगळ्यात मोठा बोन्साय संग्रह आणि तोही पुण्यात! 'बोन्साय लेडी'चा नवा विक्रम

पुणे, 11 जुलै : आता पावसाळ्यामध्ये कोणती झाडं वाढवायची याचं प्लॅनिंग तुम्ही करत असाल. घराच्या अंगणात या पावसाच्या दिवसांत झाडं लावली तर ती चांगली वाढतात. पण ज्यांच्याकडे एवढी जागा नसेल आणि तरीही झाडांची खूप आवड असेल तर एक छान पर्याय आहे.

आपण जाणार आहोत... पुण्याच्या प्राजक्ता काळेंच्या बोन्साय गार्डनमध्ये. त्यांच्याकडे त्यांनी विकसित केलेली अशी साडेतीन हजार बोन्साय आहेत. एखाद्या महावृक्षासारखं दिसणारं बोन्साय बनवणं ही फार सुंदर कला आहे.झाडांवर मनापासून प्रेम करणाऱ्या प्राजक्ता काळेंनी त्यांच्या या बोन्साय संग्रहात 150 पेक्षा जास्त झाडांच्या प्रजातींची बोन्साय केली आहेत.

ग्रीन फिंगर्स

प्राजक्ता काळेंनी एकदा बोन्साय बनवण्याच्या कोर्सबद्दल वाचलं. या कोर्समध्ये त्या जे शिकल्या त्यातून तर हा चमत्कार घडलाच पण त्यांच्याकडे ही झाडं वाढवण्यासाठी 'ग्रीन फिंगर्स' आहेत. म्हणजे त्यांनी जर एखादं बोन्साय बनवलं तर ते चांगलं मूळ धरतं आणि फोफावतंही.

Loading...

बोन्साय बनवण्याची ही कला जपानची कला म्हणून ओळखली जाते पण त्याहीआधी तिचा उगम चीनमध्ये आढळतो. पण आता मात्र भारतीय असलेल्या या 'बोन्साय लेडी' ने या क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

झाडं नाही, ही तर मुलं

बोन्साय विकसित करण्यासाठी खूप मेहनत लागते. ते झाड वाढेपर्यंत तुमच्याकडे तेवढा धीरही हवा, ध्यास हवा आणि झाडांवर प्रेम हवं.

प्राजक्ता काळे सांगतात, 'माझ्याकडे एवढी बोन्साय आहेत पण त्यातल्या एखाद्या जरी झाडाला काही झालं तर मला लगेच कळतं. आईला जशी आपल्या मुलांवर मायेची पाखर घालावी लागते तसं कोणत्या झाडाला माझी जास्त गरज आहे, हे माझ्या पटकन लक्षात येतं आणि मी लगेच त्या झाडाची काळजी घ्यायला सरसावते. ही झाडं नाहीत तर माझी मुलंच आहेत !'

AUS vs ENG : 44 वर्षांपूर्वीचा हिशोब चुकता करणार का इंग्लंड?

भारतामध्ये झाडांचं वैविध्य खूप आहे. वडाच्या प्रजातीतली भरपूर झाडं आपल्याला पाहायला मिळतात. अशा झाडांची बोन्साय करण्याची कला आपण जोपासली तर हा एक मोठा व्यवसाय होऊ शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे.

बोन्साय निर्यातीचा व्यवसाय

प्राजक्ता काळे आता महिलांना बोन्साय बनवण्याच्या या कलेचं प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्र सरकारने स्किल इंडिया या कार्यक्रमात बोन्साय डेव्हलपमेंटच्या कोर्सचा अंतर्भाव केला आहे.

आपल्याकडचं हवामान आणि जैवविविधतेचा फायदा घेऊन आपणही अशी बोन्साय बनवून ती निर्यात करू शकतो, असं त्या म्हणतात.

या बोन्साय लेडीपासून प्रेरणा घेऊन तुम्हीही असा हा हिरवागार व्यवसाय सुरू करू शकता.

==============================================================================

VIDEO: खडकवासला धरणातून पाण्याचा वेग वाढला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 11, 2019 02:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...