वाशीम जिल्ह्यात दारुबंदीसाठी महिलांनी दिली पोलीस स्टेशनवर धडक

दारूबंदी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा महिलांनी दिलाय.

News18 Lokmat | Updated On: Jul 9, 2019 09:37 PM IST

वाशीम जिल्ह्यात दारुबंदीसाठी महिलांनी दिली पोलीस स्टेशनवर धडक

वाशीम 9 जुलै : दारुबंदीसाठी महिलांनी वाशीम जिल्ह्यात मोठं आंदोलन उभं केलंय. जिल्ह्याच्या उमरा शमशोद्दीन गांवात दारूबंदी करण्यासाठी गावातील महिलांनी अनसिंग पोलीस स्टेशनवर जोरदार धडक दिली. या गावात तातडीने दारूबंदी करावी अशी मागणी या महिलांनी केलीय. गेल्या अनेक वर्षांपासून दारुबंदी करावी अशी मागणी महिला करत होत्या. मात्र काहीही कारवाई होत नसल्याने अखेर महिलांनी पोलीस स्टेशनवरच धडक दिल्याने पोलिसांना त्याची दखल घ्यावी लागली.

उमरा गांवात फार मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री होते. या दारूमुळे गांवातील तरुण  व्यसनाधीन बनले असून अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. गावातील देशी आणि विदेशी दारुची मोठी विक्री होते. माणसं आपल्या कमाईतला मोठा हिस्सा दारुत खर्च करतात त्यामुळे घरात काम करणाऱ्या बायांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.

VIDEO : 2 वर्षाच्या चिमुरडीचं डोकं पातेल्यात अडकलं अन्...

हातावर पोट असलेल्या कुटुंबातल्या माणसाने जर सर्व पैसे दारुत उडवले तर जगायचं कसं, कुटुंब चालवायचं कसं असा महिलांचा प्रश्न आहे. याच त्रासातून गावातल्या सर्व महिला संघटीत झाल्या आणि त्यांनी आंदोलन छेडलं. गावतल्याच काही पुरुषांचीही या आंदोलनाला साथ आहे.

लोकसभेत राहुल बॅकबेंचर! सोनिया गांधींच्या या निर्णयामुळे राहुलच्या जागेला धक्का

Loading...

प्रशासनाने तातडीने कारवाई करत गावतली दारुची दुकानं आणि हातभट्ट्या तातडीने बंद कराव्यात अशी मागणी महिलांनी केलीय. महिलांनी अनसिंग पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून ठाणेदारांना निवेदनही दिलं दारूबंदी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचंही यावेळी महिलांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Liquor ban
First Published: Jul 9, 2019 09:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...