S M L

चंदपुरीत दारूबंदीसाठी निवडणूक; 1111 महिलांचा दारूबंदीला कौल

या गावात तब्बल १६ दारूची दुकाने होती. त्यामुळे गावातील तरुण वर्ग दारूच्या आहारी जात होता. हे पाहून महिलांनी याबाबत आवाज उठवला आणि बाटली आडवी करण्यासाठी मतदान घेण्याची मागणी केली होती. मतदानाच्या दिवशी सकाळ पासून मतदान केंद्रावर महिलांनी गर्दी केली

Chittatosh Khandekar | Updated On: Nov 4, 2017 06:27 PM IST

चंदपुरीत दारूबंदीसाठी निवडणूक; 1111 महिलांचा दारूबंदीला कौल

नाशिक, 04 नोव्हेंबर: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील चंदपुरी गावात दारूबंदी करण्यासाठी निवडणुकीत घेण्यात आली. महिलांनी उत्स्फुर्तपणे या निवडणुकीत सहभाग घेऊन झालेल्या १२३७ पैकी ११११ महिलांनी दारूबंदीच्या बाजूने मतदान करून बाटली आडवी केली.

सुमारे अडीच हजार लोकसंख्या असलेलले चंदपुरी गाव खंडोबाच्या मंदिरामुळे सर्वत्र प्रसिद्ध आहे. एका प्रकारे तीर्थक्षेत्र मानल्या जाणाऱ्या या गावात तब्बल १६ दारूची दुकाने होती. त्यामुळे गावातील तरुण वर्ग दारूच्या आहारी जात होता. हे पाहून महिलांनी याबाबत आवाज उठवला आणि बाटली आडवी करण्यासाठी मतदान घेण्याची मागणी केली होती. मतदानाच्या दिवशी सकाळ पासून मतदान केंद्रावर महिलांनी गर्दी केली.

सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला त्यात दारूबंदीच्या बाजूने मोठ्या प्रमाणात मतदान झाले. मद्य सम्राटाशी दोन हात करणाऱ्या नारीशाक्तीचा विजय झाल्याने या गावातील १६ दारू दुकाने कायमस्वरूपी बंद झाली आहेत.निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन बाटली आडवी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर करताच महिलांनी एकच जल्लोष केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 4, 2017 06:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close