वाशिम तालुक्यात पोटच्या मुलासह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

वाशिम तालुक्यात पोटच्या मुलासह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

पोटच्या मुलासह आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाशिम तालुक्यातील वारला इथे घडली आहे. कविता वाघ (वय-27) आणि प्रशांत वाघ (वय- 6 वर्षे) असे मृतकांची नावे आहेत.

  • Share this:

किशोर गोमाशे, (प्रतिनिधी)

वाशिम, 29 जून- पोटच्या मुलासह आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाशिम तालुक्यातील वारला इथे घडली आहे. कविता वाघ (वय-27) आणि प्रशांत वाघ (वय- 6 वर्षे) असे मृतकांची नावे आहेत.

या महिलेने आपल्या पोटच्या मुलासह आत्महत्या का केली, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून 3 शेतकरी ठार

यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून 3 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. नेर, दिग्रस, उमरखेड तालुक्यातील या घटना घडल्या आहेत. दादाराव राठोड, (रा.मारवाडी, ता. नेर), चंद्रभान चव्हाण, (रा.आरंभी,ता.दिग्रस),प्रकाश मानतुटे, (रा.निंगणूर,ता.उमरखेड) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. तिघे शेतात काम करत असताना अंगावर त्यांचा मृत्यू झाला.

PAK vs AFG क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या तिघांना अटक

विश्वचषकातील पाकिस्तान विरूद्ध अफगाणिस्तान क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तिघांना अकोल्यातील खदान पोलिसांनी अटक केली आहे. अकोला शहरातील आदर्श कॉलनी येथील आहुजा अपार्टमेंटमध्ये क्रिकेट सट्टा सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून खदान पोलिसांनी आहुजा अपार्टमेंटमध्ये छापा टाकला. या अपार्टमेंटमधून सट्टा लावणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून एक लॅपटॉप, सहा मोबाइल, टीव्ही, सेटटॉप बॉक्स जप्त केला आहे.

वाहतूक सुरू होण्याआधीच पुलाला भगदाडं, प्रशासनाच्या कामाची पोलखोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 29, 2019 10:34 PM IST

ताज्या बातम्या