News18 Lokmat

मुख्यमंत्र्यांचं शहर पुन्हा हादरलं, महिलेचं अपहरण करून बलात्कार

महिला रेल्वे स्थानकावर एकटी असल्याचा फायदा घेत एका अज्ञात व्यक्तीनं या महिलेचं अपहण केलं आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.

News18 Lokmat | Updated On: Dec 2, 2018 11:40 AM IST

मुख्यमंत्र्यांचं शहर पुन्हा हादरलं, महिलेचं अपहरण करून बलात्कार

नागपूर, 2 डिसेंबर : रेल्वे स्थानकावरून महिलेचं अपहरण करून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. पीडित महिला ही नोकरीसाठी त्रिपुराहून नागपूरमध्ये आली होती. नागपुरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीत सातत्याने वाढ होत असताना हा प्रकार समोर आला आहे.

महिला रेल्वे स्थानकावर एकटी असल्याचा फायदा घेत एका अज्ञात व्यक्तीनं या महिलेचं अपहण केलं आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण अजूनही आरोपीचा शोध लागू शकला नाही.

त्रिपुरा राज्यातील महिला चार महिन्यांपूर्वी नोकरीसाठी कोईबतूर येथे आली होती. आता त्रिपुरा राज्यात परत जात असताना नागपूर रेल्वे स्थानकावर तिच्यासोबत हा प्रसंग घडला आहे.

रेल्वे स्थानकासारख्या ठिकाणाहून महिलेचं अपहरण केलं गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या प्रकरणानंतर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शहर असलेल्या नागपुरात गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच नागपुरमध्ये एका महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता दुसऱ्या राज्यातील एका महिलेवर बलात्कार झाल्याने पुन्हा एकदा नागपूरमधील महिला सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Loading...

मुख्यमंत्री असणारे फडणवीस हे राज्याचे गृहमंत्रीदेखील आहेत. अशात त्यांच्याच शहरातून गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. असे गुन्हे घडू नये, म्हणून येत्या काळात मुख्यमंत्री फडणवीस याबाबत काही ठोस कारवाई करतात का, हे पाहावं लागेल.


VIDEO : दुष्काळाचं दुष्टचक्र : आता या गावात उरली आहेत फक्त वृद्ध मंडळी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 2, 2018 11:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...