S M L

महिला कैदींनी 'अशी' केली भाऊबीज साजरी

राज्य महिला आयोगाच्या वतीने हर्सूल कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या महिला कैदींसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 21, 2017 08:09 PM IST

महिला कैदींनी 'अशी' केली भाऊबीज साजरी

औरंगाबाद, 21 ऑक्टोबर: आज भाऊबीजेचा सण. भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा सण म्हणजे भाऊबीज.महिला कैद्यांन्याही हा सण साजरा करता यावा म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीने आज हर्सूलच्या कारागृहात भाऊबीजेचा सण साजरा करण्यात आला.

राज्य महिला आयोगाच्या वतीने हर्सूल कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या महिला कैदींसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महिला कैदींना साडी वाटप केल्या. बंदी महिला आपल्या घरापासून दूर असतात.तेव्हा त्यांनादेखील दिवाळीचा सण साजरा करता यावा याकरिता हा सण साजरा करण्यात आल्याचं विजया रहाटकर यांनी सांगितलं. यापुढे शिक्षा भोगत असलेल्या महिला बंदींना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी वैद्यकीय अधिकारी नेमणूक करणार असल्याचंही विजया रहाटकर यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 21, 2017 08:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close