टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार, संतप्त जमावानं पेटवला टिप्पर

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परची दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार महिला जागेवरच ठार झाली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 19, 2019 08:38 PM IST

टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार, संतप्त जमावानं पेटवला टिप्पर

अमोल गावंडे, (प्रतिनिधी)

बुलडाणा, 19 जुलै- अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परची दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार महिला जागेवरच ठार झाली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी टिप्पर पेटवून दिला.

भरधाव वेगाने धावणारी वाहने नेहमीच अपघाताला कारणीभूत ठरतात आणि असाच एक अपघात बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव-जलंब मार्गावर झाला. अवैध वाळू वाहून नेणाऱ्या भरधाव टिप्परने रोडवरील एका दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील महिला ललीता सुपडा जाणे (वय-52, रा .गाडेगाव, बु. ता.जळगाव जामोद) जागेवरच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. एक जण जखमी असून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ललीता जाणे यांची घरी कुणीतरी वाट पाहत असेल परंतु घरी पोहोचण्याच्या अगोदरच काळाने या महिलेवर झडप घातली आणि यात तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या टिप्परने धडक दिल्यानंतर घटनास्थळी असलेल्या संतप्त जमावाने या टिप्परला पेटवून दिले. भरधाव चालवणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त प्रमाण हे वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचे आहे. अपघातालाच नव्हे तर अशा प्रकारच्या सदोष मनुष्य बळीला नेमके कोण जबाबदार आहे, हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.

पोटच्या 2 चिमुरड्यांना फासावर लटकावून जन्मदात्रीनेही केली आत्महत्या

Loading...

पोटच्या 2 चिमुरड्यांना फासावर लटकावून जन्मदात्री आईने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला. वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव इथे गुरुवारी ही हृदयद्रावक घटना घडली. जयश्री गजानन गवारे (वय-28), गणेश (वय- 5) आणि मोहित (वय-3) अशी मृतांची नावे आहेत.

तोंडगाव माहेर असलेल्या जयश्री गजानन गवारे या विवाहितेने घरी कुणीच नाही, हे पाहून दरवाजा आतून बंद केला. मोठा मुलगा गणेश आणि धाकटा मोहितला आधी फासावर लटकावले. नंतर तिने स्वतः ही गळफास लावून घेत आत्महत्या केली. जयश्री ही मागील 3 वर्षांपासून माहेरीच राहत होती. तिचा पती दारू पिऊन नेहमी मारहाण करत होता. त्यामुळे ती माहेरी आली होती. त्यांच्यामधील वादाचा खटला वाशिम न्यायालयात सुरू आहे. हा खटला अंतिम टप्प्यात असल्याने आपणास काही दिवसांनी नवऱ्याकडे जावे लागेल, या विवंचनेत ती होती. यातूच तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. या तिहेरी आत्महत्येमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

VIDEO : रोडरोमिओला तरुणीने दाखवला नागपुरी झटका, आता परत करणारा नाही हिंमत!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 19, 2019 08:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...