जीवासाठी असणारा व्यायाम जीव का घेतो ?, जिममध्ये तरुणीचा मृत्यू

जीवासाठी असणारा व्यायाम जीव का घेतो ?, जिममध्ये तरुणीचा मृत्यू

एका क्षणी जोर बैठका मारणारी जिनेडा उभी राहिली आणि ती जागीच कोसळली.

  • Share this:

रोहन कदम आणि विजय देसाई, वसई

28 जून : वसईत व्यायाम करताना एका तरुणीचा मृत्यू झालाय. गेल्या दहा दिवसांत दोन जणांचा व्यायाम करताना मृत्यू झाल्यानं व्यायामाच्या तंत्राविषयी पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झालीये.

वसईत जिनेडा कार्व्हालो या तरुणीचाही जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाला. 30 वर्षांची जिनेडा ही एव्हरशाईन जीममध्ये नेहमीप्रमाणं व्यायाम करण्यासाठी गेली होती. यावेळी जिनेडा जोर बैठका मारत होती. एका क्षणी जोर बैठका मारणारी जिनेडा उभी राहिली आणि ती जागीच कोसळली. जिनेडाचा हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच तिचा मृत्यू झाला. जिनेडा ही गेल्या अनेक वर्षांपासून नियमित व्यायाम करी होती असं तिच्या मैत्रिणीनं सांगितलं.

गेल्या दहा दिवसांत व्यायाम करताना घडलेली ही दुसरी घटना आहे. तरुण तरुणी व्यायाम करण्यासाठी जिममध्ये जातात पण पुरेसा वॉर्म अप न केल्यानं अशा घटना घडल्याचं सांगण्यात येतं.

व्यायाम करणं हे आरोग्यासाठी हितकारक असतं. पण व्यायाम करण्यामागंही शास्त्र आणि तंत्र आहे. हे तंत्र जे पाळत नाही त्यांच्या ते जिवावर बेततं हे पुन्हा अधोरेखित झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2017 07:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...