पिंपरी चिंचवडमध्ये तरुणीवर भरदिवसा चाकूने वार, गंभीर जखमी

पिंपरी चिंचवडमध्ये तरुणीवर भरदिवसा चाकूने वार, गंभीर जखमी

तरुणीवर चाकूने हल्ला केल्याची ही धक्कादायक सकाळी दहाच्या सुमारास घडली.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 26 जून : पिंपरी चिंचवडमधील डांगे चौक इथं तरुणीवर भरदिवसा चाकूने वार करण्यात आले आहेत. गौरी माळी असं या घटनेत जखमी झालेल्या तरुणीचे नाव असून तिच्यावर वार करणाऱ्या विकास शेटे या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

तरुणीवर चाकूने हल्ला केल्याची ही धक्कादायक सकाळी दहाच्या सुमारास घडली. जखमी तरुणी डांगे चौक येथील स्पंदन रुग्णालयात 'रिसेप्शनिस्ट' आहे. सकाळी ती नेहमीप्रमाणे कामावर येत असताना आरोपी विकासने पाठीमागून येऊन तिच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या गौरीला एका खासगी रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी विकास शेटे याला ताब्यात घेतलं आहे. मात्र हल्ल्याचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. याप्रकरणी वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. खून, दरोडा आणि बलात्कार यांसारख्या घटना शहरामध्ये सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे अशा घटना थांबवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालं आहे.

VIRAL FACT : या विचित्र हास्यामागे दडलंय काय? हे आहे सत्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 26, 2019 12:07 PM IST

ताज्या बातम्या