प्रियकराच्या मदतीने केली मैत्रिणीची हत्या, महिलाने रचला होता स्वत:च्या बनावट मृत्यूचा कट

विवाहित महिलेने प्रियकराच्या मदतीने मैत्रिणीची निर्घृण हत्या केली. नंतर स्वत:चे कपडे, चप्पल आणि दागिने तिच्या अंगावर चढवून स्वत:च्या बनावट मृत्यूचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 8, 2019 08:09 PM IST

प्रियकराच्या मदतीने केली मैत्रिणीची हत्या, महिलाने रचला होता स्वत:च्या बनावट मृत्यूचा कट

औरंगाबाद, 8 जून- विवाहित महिलेने प्रियकराच्या मदतीने मैत्रिणीची निर्घृण हत्या केली. नंतर स्वत:चे कपडे, चप्पल आणि दागिने तिच्या अंगावर चढवून स्वत:च्या बनावट मृत्यूचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, मुख्य आरोपी सोनाली शिंदे (वय-26) हिचे दुसरा आरोपी छब्बादास वैष्णव याच्याशी प्रेमसंबंध सुरु आहे. सोनालीचा प्रियकरासोबत पळून जाण्याचा प्लान होता. परंतु, पळून गेल्यानंतर आपला कोणीही शोध घेऊ नये, असे सोनालीची इच्छा होती. यासाठी सोनालीने प्रियकराच्या मदतीने मैत्रीण रुक्मिणी माळी हिची हत्या केली. सोनाली आणि रुक्मिणी या दोन्ही शरीरयष्टीने सारख्याच होत्या. हत्येनंतर सोनालीने स्वत:चे कपडे, चप्पल आणि दागिने रुक्मिणीच्या अंगावर चढवले आणि स्वत:च्या बनावट मृत्यूचा कट रचला.

पतीलाही अडकवणार होता सोनाली..

या प्रकरणात आपल्या पतीलाही अडकवण्याचा सोनालीचा इरादा होता. कारण त्याला दारूचे व्यसन आहे. तो नशेत तिला मारहाण करत होता. त्यामुळे पतीनेच आपल्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोपी सोनालीला भासवून द्यायचे होते. परंतु पोलीस चौकशीत सत्य समोर आले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना जळगाव जिल्ह्यातून अटक केली.

काय आहे हे प्रकरण?

Loading...

दरम्यान, औरंगाबादेत काही दिवसांपूर्वी एक अर्धजळीत मृतदेह सापडला होता. मृतदेहाजवळ एक सुसाइड नोट देखील सापडली होती. त्यात लिहिले होते की, 'ती (सोनाली) आत्महत्या करत आहे. कारण पती दारुडा आहे. तिला तो कायम मारझोड करतो.' मात्र, पोलिस चौकशीत अर्धजळीत मृतदेह हा 31 वर्षीय रुक्मिणी माळी हिचा असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी सोनाली आणि छब्बादास वैष्णव याला अटक केली.


थुंकी चाटायला लावून दोघांना अमानुष मारहाण, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2019 08:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...