अन्नदान करायला आलेल्या महिलेचा मुलांसमोरच मृत्यू

मुलांसमोरच हा अपघात झाल्यामुळे वारकरी संतप्त झाले होते

News18 Lokmat | Updated On: Jul 15, 2018 05:06 PM IST

अन्नदान करायला आलेल्या महिलेचा मुलांसमोरच मृत्यू

सातारा, 15 जुलैः संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेऊन येताना एका महिलेचा रात्री रस्ता ओलांडताना दुर्दैवी मृत्यू झाला. कविता विशाल तोष्णीवाल (42) यांना पाण्याच्या टँकरने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर येथील विशाल तोष्णीवाल आणि त्यांचे कुंटुबीय श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी आणि अन्नदान करण्यासाठी शनिवारी रात्री तरडगाव येथे गेले होते.

रात्री 12.30 वाजता माऊलीचे दर्शन घेतल्यानंतर पालखी तळाजवळ लोणंद- फलटण रोड क्रॉस करण्यासाठी मध्यभागी डिव्हायडरवर थांबलेल्या होत्या. यावेळी कविता यांना लोणंदकडून फलटणकडे जाणाऱ्या पाणी टँकर क्र. एमएच १०- झेड- २७०८ ने जोरदार धडक दिली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातावेळी दोन लहान मुलंही त्यांच्यासोबत होती. मुलांसमोरच हा अपघात झाल्यामुळे वारकरी संतप्त झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनमध्ये टँकर चालक यशवंत पावले, सांगली याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचाः

'5 बळी गेले पण 5 लाख लोक घरी सुरक्षित तर जातात ना,' चंद्रकांत पाटील यांचं अजब विधान

अमित ठाकरेंच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

Loading...

नुकसान सहन करून गोकुळचे संकलन उद्या बंद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2018 05:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...