S M L

आरोग्य सेविका नसल्यामुळे गडचिरोलीत महिलेची रस्त्यावरच प्रसुती

पांढरी मडावी या महिलेला प्रसुती वेदना सुरु झाल्यानंतर तिला प्रसुतीसाठी आलापल्लीच्या उपकेंद्रावर आणण्यात आलं होतं. मात्र उपकेंद्र सकाळी बंद अवस्थेत होतं. तर आरोग्यसेविकाही उपस्थित नव्हती.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 31, 2017 10:11 AM IST

आरोग्य सेविका नसल्यामुळे गडचिरोलीत महिलेची रस्त्यावरच प्रसुती

गडचिरोली,31 ऑक्टोबर: गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यात आलापल्ली इथं आरोग्य सेविका उपस्थित नसल्यानं आरोग्य केंद्राच्या समोरच एका महिलेची रस्त्यावर प्रसुती झाली. काल सकाळी हा सगळा प्रकार घडलाय.

पांढरी मडावी या महिलेला प्रसुती वेदना सुरु झाल्यानंतर तिला प्रसुतीसाठी आलापल्लीच्या उपकेंद्रावर आणण्यात आलं होतं. मात्र उपकेंद्र सकाळी बंद अवस्थेत होतं. तर आरोग्यसेविकाही उपस्थित नव्हती. तोपर्यंत महिलेला प्रसुतीची कळा सुरु झाली आणि चक्क रस्त्यावरच त्या महिलेनं बाळाला जन्म दिला. महत्त्वाचं म्हणजे त्या महिलेची ओरड ऐकून आजुबाजूच्या महिला साड्या घेऊन आल्या त्यानी चारी बाजुंनी साडयाचं कडं तयार केलं. आता या घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागात खळबळ उडालीय.

जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिलेत. गडचिरोली जिल्ह्यात आरोग्याचे कसे तीनतेरा वाजले याची अनेक उदाहरणं वेळोवेळी समोर येत असतात. कधी रुग्णवाहिका उपलब्ध नाही तर कधी डॉक्टर.. या सगळ्यात दुर्गम भागातल्या आदिवासी नागरिकांच्या आरोग्याचा मात्र खेळ होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 31, 2017 10:11 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close