News18 Lokmat

पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आढळला महिलेचा मृतदेह

देहू रोड पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई-बंगळुरू महामार्गालगत एका खड्ड्यामध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला.

News18 Lokmat | Updated On: Jun 9, 2019 06:13 PM IST

पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आढळला महिलेचा मृतदेह

मावळ, 9 जून- देहू रोड पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई-बंगळुरू महामार्गालगत एका खड्ड्यामध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. ही घटना देहुरोड शहरात वार्‍यासारखी पसरली आहे. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे.

मिळालेली माहिती अशी की, मुंबई-बंगळुरू महामार्गालगत मागील काही दिवसांपूर्वी दुर्गंधी पसरली होती. पाहणी करण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबलेला आढळून आल्याने संबंधित महिलेचा खून करून मृतदेह रस्त्यालगत आणून टाकल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटली नसून देहूरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.

इंद्रायणीत हजारो मासे मृत्युमुखी..

इंद्रायणी नदीच्या काठावर हजारो मृत माशांचा खच पडला आहे. दूषित पाण्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने मासे मृत्युमुखी पडल्याची संशय व्यक्त केला जात आहे. पवना नदी पाठोपाठ इंद्रायणी नदीतील माशांच्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. माशांच्या मृत्युप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तसेच गावकऱ्यांतर्फे रविवारी सायंकाळी हजारो माशांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे.

मल्टीप्लेक्समध्ये विकले जाणारे समोसे तयार होतात अत्यंत गलिच्छ वातावरणात

Loading...

पिंपरी चिंचवडसह परिसरात असलेल्या मल्टीप्लेक्समध्ये विकले जाणारे समोसे अत्यंत गलिच्छ वातावरणात तयार होतात, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुणे अन्न व औषध प्रशासन विभागाने टाकलेल्या धाडमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी समोसे बनविणाऱ्या कारखाऱ्यावर रविवारी धाड टाकली. त्यानंतर ही बाब उघडकीस आली आहे. पिंपरी चिंचवडमधील खराळवाडी परिसरातील एम. के.एंटरप्राईज कंपनीमार्फत या समोस्यांच उत्पादन घेतले जाते. मात्र, ज्या ठिकाणी समोसे बनविले जातात ते ठिकाण अत्यंत गलिच्छ असल्याचे या कारवाईत उघड झाले. दरम्यान, या कारवाईनंतर सदर समोसे उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्यात आल्याची माहिती पुणे अन्न व औषध प्रसासन विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी दिली आहे.


VIDEO: इंद्रायणी नदीकाठावर मृत माशांचा खच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2019 06:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...