प्रेमात अडथळा येणाऱ्या पतीची पत्नीच्या प्रियकराने केली हत्या

प्रेमात अडथळा येणाऱ्या पतीची पत्नीच्या प्रियकराने केली हत्या

या प्रकरणी इशांत मुनघाटे या आरोपीला पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या दहा तासात अटक केलीय.

  • Share this:

17 जुलै : नागपुरात प्रेमात अडथळा येत होता म्हणून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना घडलीये. मनोज लोणकर असं या मृत व्यक्‍तीचं नाव आहे. या प्रकरणी इशांत मुनघाटे या आरोपीला पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या दहा तासात अटक केलीय.

मृत मनोज आणि त्याची पत्नी सोनू लोणकर यांच्यात नेहमी भांडणं व्हायचं. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून सोनू मनोजला सोडून दुसऱ्या ठिकाणी राहत होती. दरम्यान, तिचं आरोपी 24 वर्षीय इशांत मुनघाटे याच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. मनोज आणि इशांत हे मित्र आहेत. मनोजला या दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली होती. त्यामुळे काल रविवारी तो पत्नी सोनू हिच्याकडे आला. यावेळी दोघांमध्ये कडाक्‍याचं भांडण झालं. याची माहिती प्रियकर इशांतला मिळाली आणि मनोज प्रेमात अडसर ठरत असल्यानं त्यानं त्याचा काटा काढण्याचं ठरवलं.

रात्री मनोज हा राजकमल चौकात बसला असताना इशांत तिथं आला आणि त्याच्या डोक्‍यात सिमेंटचा दगड मारला. यात मनोजचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी अवघ्या दहा तासांत या प्रकरणाचा छडा लावत आरोपी इशांतला अटक केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2017 05:36 PM IST

ताज्या बातम्या