माता न तू वैरणी, मसाल्यात पाणी सांडलं म्हणून आईने चिमुरडीच्या गुप्तांगाला दिले चटके

स्वयंपाक करत असताना मसाल्यात पाणी पडल्यामुळे पाच वर्षांच्या चिमुरडीच्या गुप्तांगासह सर्व अंगावर सख्ख्या आईनेच चटके दिल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडलीये.

Sachin Salve | Updated On: Nov 11, 2017 07:37 PM IST

माता न तू वैरणी, मसाल्यात पाणी सांडलं म्हणून आईने चिमुरडीच्या गुप्तांगाला दिले चटके

11 नोव्हेंबर : स्वयंपाक करत असताना मसाल्यात पाणी पडल्यामुळे पाच वर्षांच्या चिमुरडीच्या गुप्तांगासह सर्व अंगावर सख्ख्या आईनेच चटके दिल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडलीये.  या आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

चिमुरडीच्या शेजारी राहणाऱ्या रजनीश तिवारी यांनी हा प्रकार उघडकीस आणलाय. गोंधळेनगर परिसरात कामानिमित्त काही खोल्या भाड्याने घेतल्या आहेत. याठिकाणी पीडित चिमुरडी नेहमी येत असे. दरम्यान, काल ही चिमुरडी नेहमीप्रमाणे आली असता तिवारी यांनी तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण दिसले. त्यांनी चिमुकलीला विश्वासात घेत विचारपूस केली असता हा भयानक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाणे गाठत संबंधित महिलेविरोधात तक्रार दिली.

तिवारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, केवळ मसाल्यामध्ये पाणी सांडल्याच्या कारणावरून या चिमुरडीला चटके देण्यात आले, शिवाय तोंडावर आणि शरीराच्या इतर भागावर मारहाण केल्याच्या खुना दिसत आहे. रात्री उशिरा तक्रार आल्याने पोलिसांना संबंधित महिलेला अटक केली नाही. मात्र पुढील कारवाई आज करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 11, 2017 03:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close