News18 Lokmat

तुकाराम मुंढे यांचा अविश्वास प्रस्ताव मागे घ्या, मुख्यमंत्र्यांचा आदेश

नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधातला अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2018 10:21 AM IST

तुकाराम मुंढे यांचा अविश्वास प्रस्ताव मागे घ्या, मुख्यमंत्र्यांचा आदेश

नाशिक, 31 ऑगस्ट : नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधातला अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. भाजपच्या नगरसेवकांडून उद्या 1 सप्टेंबर रोजी मुंढेविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात येणार होता, मात्र त्याआधीच मुख्यमंत्र्यांनी अविश्वास ठराव मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान काल अविश्वास ठरावावर नाशिक महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. करवाढीवर सोशल मीडियामधून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आपण कर जास्त नाही तर कमी केला असल्याचा दावा मुंढेंनी केला आहे.

तर भाजपच्याच नगरसेवकांनी मुंढेंविरोधात अविश्वास ठराव आणला होता. पण जनतेच्या दबावामुळे मुख्यमंत्र्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. तुकाराम मुंढेंविरोधातला अविश्वास ठराव मागे घ्या असे आदेश मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या भाजप नगरसेवकांना दिले आहे.

दरम्यान, या वादात तुकाराम मुंढेही एक पाऊल मागे आलेत. कालच त्यांनी वाढीव करवाढ मागे घेतल्याचं जाहीर केलंय. याबाबत सोशल मीडियावर समभ्रम निर्माण केला जात आहे. 1 एप्रिल 2018 ननंतर ज्या नवीन इमारती आहेत त्यांना रेटेबल व्हॅल्यू लागते, अस्तित्वात असणाऱ्या जुन्या इमारतींना रेटेबल व्हॅल्यु लागत नाही. मोकळ्या भूखंडावर असणारा 40 पैसे टॅक्स केला होता तो आता 3 पैसे पर स्केवर फूट केला. आरसीसी इमारतीला 2 रुपये केला होता तो 1 रुपये केला आहे. त्यामुळे कर वाढवण्यात नाही तर कमी करण्यात आल्याच तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे. वाढविलेले कर कमी केलेत.

 

Bigg Boss 12 : लिक झाली यादी, हे 6 सेलिब्रिटी होणार सहभागी

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 31, 2018 10:20 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...