08 सप्टेंबर : पाहता पाहता गणेशोत्सवाचे दिवस कसे संपले ते काही कळलंच नाही. गणपती कलेचं दैवत. त्यामुळे IBNलोकमतनं शाळेतल्या मुला-मुलींसाठी बालगणेश स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला. छोट्यांची एक एक कल्पनाशक्ती, त्यांची चित्र पाहून थक्क व्हायला झालं. गणपतीची नयनरम्य रूपं या छोट्यांनी साकारली.
यातून 11 विजेत्यांची निवड करायची होती. खरं तर हे कठीण काम. पण तरीही आम्ही त्यातून 11 विजेत्यांची निवड केली. बक्षिसाची एकूण रक्कम आहे 11 हजार रुपये असून प्रत्येकी एका-एका विजेत्याला गिफ्ट व्हाऊचर स्वरूपात देण्यात येणार आहे.
हे विजेते आहेत
अनन्या अष्टपुत्रे, ठाणे
आर्या घोलप, नाशिक
दुर्वा कोकणे, पुणे
मेघा बदामे, मुंबई
रिद्धी जाधव, नाशिक
श्रावणी जाधव, कळवा, ठाणे
श्री शहा, पालघर
सुयश कदम, डोंबिवली
तनिशा सावंत, मुंबई
तन्मय पेडणेकर, ठाणे
वसुधा पाटील, नाशिक
बालगणेश साकारणारे हे बालकलाकार. सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. गणपती बाप्पा मोरया!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा