विदर्भात 24 ते 26 जानेवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता

गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांतील बऱ्याच भागात काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता

News18 Lokmat | Updated On: Jan 22, 2019 07:26 PM IST

विदर्भात 24 ते 26 जानेवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता

मुंबई, 22 जानेवारी  : राज्यातल्या पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे 24 ते 26 जानेवारी दरम्यान विदर्भात प्रामुख्याने पूर्व-विदर्भात वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांतील बऱ्याच भागात या दरम्यान मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाच्या परिस्थितीनुसार नियोजन करावे आणि शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. तसंच बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा, असं आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांतील बऱ्याच भागात काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही. ढगाळी वातावरणामुळे विदर्भातील कमाल तापमान कमी होतील आणि किमान 29 जानेवारीपर्यंत तरी कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहतील. वाढलेल्या आर्द्रतेमुळे  24 ते 27 जानेवारी या काळात काही प्रमाणात धुकं पडेल. या दरम्यान, मराठवाड्यातील काही भागात ढगाळ वातावरण राहील आणि नांदेड जिल्ह्यांतील काही भागात हलक्या पावसाची शक्यता राहील.

शेतकऱ्यांनी या हवामानाची स्थितीनुसार, नियोजन करावे आणि शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. तसंच बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल तर तो व्यवस्थितपणे झाकून ठेवावा. वादळी पावसाच्या स्थितीत सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा आणि मोकळ्या मैदानात तसंच झाडाखाली आणि पत्राच्या शेडमध्ये थांबणे टाळावे, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

Loading...

===============

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2019 07:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...