धक्कादायक! फेसबुकवरून झालेल्या प्रेमासाठी पत्नीने पतीचा काढला काटा

आरोपी पत्नी रश्मी पौणिकर आणि तिचा आरोपी प्रियकर प्रज्वल भैसारे या दोघांनी हे कृत्य केलं असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 10, 2019 09:34 AM IST

धक्कादायक! फेसबुकवरून झालेल्या प्रेमासाठी पत्नीने पतीचा काढला काटा

नागपूर, 10 जानेवारी : नागपूरमध्ये एका विवाहितेने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या यशोधानगर परिसरात ही घटना घडली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली आहे. शेखर रमेश पौनीकर असं मृत पतीचं नाव आहे.

यशोधानगरमध्ये झालेल्या घटनेचा अवघ्या 4 तासांचा पोलिसांनी शोध लावला आहे. आरोपी पत्नी रश्मी पौणिकर आणि तिचा आरोपी प्रियकर प्रज्वल भैसारे या दोघांनी हे कृत्य केलं असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. अनैतिक संबंधात अडसर येत असल्यामुळे पत्नीनेच पतीची हत्या केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

अनैतिक संबंधावरून पती सारखा संशय घ्यायचा. त्याच्या जाचाला कंटाळून त्यांची हत्या केल्याचं पत्नीने पोलिसांना सांगितलं. आरोपी पत्नी रश्मी आणि आरोपी प्रियकर प्रज्वल या दोघांनी शेखरची हत्या केली आहे.

बरं इतकंच नाही तर आपल्यावर संशय येऊ नये यासाठी त्यांनी शेखरच्या हाताची नस कापत त्याने आत्महत्या केली असल्याचा बनाव रचला. पण त्यांचा हा बनाव पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांनी पत्नी आणि प्रियकराला ताब्यात घेतलं आहे. त्यांचा आता पोलीस कसून तपास करत आहेत.

प्रज्वल हा एका गरीब कुटुंबातील मुलगा आहे. आई-वडिल आणि तो असं त्याचं कुटुंब आहे. रश्मी फेसबुकवर नेहमी अॅक्टिव्ह असायची. त्यातून तिची प्रज्वलची ओळख झाली. त्यांचं दिवस-रात्र बोलणं सुरू झालं. आणि नंतर ते  एकमेकांना भेटूही लागले. फेसबुकवरून सुरू झालेलं त्यांचं प्रेम हत्येपर्यंत कधी गेलं हे त्यांनाच कळलं नाही.

Loading...

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून पतीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तर या संपूर्ण प्रकारासंदर्भात पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सात जन्माचं नात असणाऱ्या या प्रेमळ बंधनाचा असा अंत झाल्याने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. तर पोलीस या दोघांची चौकशी करत आहेत


#MustWatch- आजचे हे 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का?
 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 10, 2019 09:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...