बायकोने 10 लाखांची सुपारी देऊन पतीला केला जीवे मारण्याचा प्रयत्न

बायकोने 10 लाखांची सुपारी देऊन पतीला केला जीवे मारण्याचा प्रयत्न

नाशिकच्या ओझर येथे पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना नाशिकमध्ये पतीला मारण्यासाठी 10 लाखांची सुपारी दिल्याची घटना घडली आहे.

  • Share this:

कपिल भास्कर,नाशिक

18 मे : नाशिकच्या ओझर येथे पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना नाशिकमध्ये पतीला मारण्यासाठी 10 लाखांची सुपारी दिल्याची घटना घडली आहे. इंजिनिअर असलेला पती चंद्रदीप सोनवणे या हल्ल्यातून बचावला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

इंजिनिअर असलेले चंद्रदीप सोनवणे यांचा दीपमाला हिच्याशी 2004 मध्ये विवाह झाला होता. त्यांना 9 वर्षांचा एक मुलगा ही आहे. मात्र त्यांचं आणि पत्नी दीपमाला यांच्यात नेहमी होणारा वाद दोन वर्षांपूर्वी कोर्टात पोहचला. मात्र कोर्टाकडून पोटगी मागितल्या पेक्षा कमी मिळाल्याचा राग आल्यानं पत्नीने माझ्यावर सुपारी देऊन हल्ला केलीच चंद्रदीपचं म्हणणं आहे.

पुण्यात आणि नाशिकच्या ओझरमध्ये पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने केलेली आत्महत्याच्या घटना ताज्या असताना पोलिसांनी देखील हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं आहे. पतीच्या तक्रारीवरून पत्नी, मेव्हणा आणि सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील आरोपीचा अंबड पोलीस शोध घेताय असून एकूणच पती पत्नीमधील भांडणाच्या घटना मधून होणाऱ्या आत्महत्या आणि हल्ल्यांच्या घटना वाढल्यात आहे. पती पत्नी मधील होणारे वाद टोकाला जाण्याअगोदरचं योग्य समुपदेशन जर झालं तर होणाऱ्या घटनांना आळा बसू शकेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 18, 2017 08:44 PM IST

ताज्या बातम्या