रावसाहेबांनी सांगितला भन्नाट किस्सा..घरी गेलो नाही म्हणून बायकोच दिल्लीला आली!

रावसाहेबांनी सांगितला भन्नाट किस्सा..घरी गेलो नाही म्हणून बायकोच दिल्लीला आली!

रावसाहेबांनी आपल्या स्टाईलमध्ये गावरान तडक्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी एक भन्नाट किस्सा सांगितला. लोकसभा निवडणुकीनंतर घरीच गेलो नाही म्हणून दुसऱ्याच दिवशी बायकोच दिल्लीला आली! असे रावसाहेब म्हणाले. दानवेंचा किस्सा ऐकताच कार्यकर्त्यांमध्ये हश्या पिकला.

  • Share this:

पुणे, 6 जुलै- भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (6 जुलै) देशभरात भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेला प्रारंभ झाला. पुण्यात सदस्य नोंदणी मोहिमेला केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. या वेळी रावसाहेबांनी आपल्या स्टाईलमध्ये गावरान तडक्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी एक भन्नाट किस्सा सांगितला. लोकसभा निवडणुकीनंतर घरीच गेलो नाही म्हणून दुसऱ्याच दिवशी बायकोच दिल्लीला आली! असे रावसाहेब म्हणाले. दानवेंचा किस्सा ऐकताच कार्यकर्त्यांमध्ये हश्या पिकला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावरून आले की, लागलीच कामाला लागतात. 18 तास काम करावं लागतं, सुट्टी नाही की सुटका नाही. लोकसभा निवडणुकीनंतर घरीच गेलो नाही. भोकरदनला अब्दूल सत्तार यांच्याकडे लग्नाला घरा समोरून गेलो. पण घरात गेलो नाही. म्हणून दुसऱ्याच दिवशी बायको दिल्लीला आली. मागच्या शनिवारी नाशिकला मेळाव्याला होतो, या शनिवारी पुण्यात तर पुढच्या शनिवारी राष्ट्रीय अध्यक्ष येणार आहेत मग घरी कधी जाणार, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

जे सभासद आहेत त्यापेक्षा 20 टक्के जास्त करायचे आहेत. मिसकॉल चालणार नाही. फॉर्मही भरावे लागणार आहेत. आगामी विधानसभा निवडणूक भाजप-सेना एकत्र लढतील. पण, काम 288 मतदार संघात करावे लागणार आहे. आपल्याला 220 जागा आणायच्या आहेत. 15 ऑक्टोबरच्या आत निवडणुका होतील, असे संकेतही दानवे यांनी दिले आहेत.

रावसाहेबांना घातली उलटी पुणेरी पगडी

भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी या वेळी रावसाहेब दानवे यांना पुणेरी पगडी परिधान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. मात्र, योगेश गोगावले यांच्याकडून अनावधानाने पगडी उलटी घालण्यात आली. काही वेळातच ही चूक लक्षात आल्यानंतर पगडी सरळ करण्यात आली.

रावसाहेव दानवेंनी केला हा गौप्यस्फोट

रावसाहेव दानवेंनी या कार्यक्रमात एक गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, विरोधी पक्षातल्या एका माजी महिला खासदारासोबत भेट झाली आहे. जिल्ह्याध्यक्षांबरोबर बोलून त्यांना लवकरच भाजपमध्ये घेणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेमके कोण भाजपच्या संपर्कात आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पक्षात कुणालाही घ्या, येण्यास बंदी नाही. काँग्रेसच्या माजी आमदार, खासदाराजवळ बसले की त्याला वाटते कधी आपल्या भाजपमध्ये घेतोय सध्या कुणीही भाजपमध्ये यायला तयार आहे. एका माजी महिला खासदाराला भेटलो आणि अंदाज घेतला. आता जिल्हा अध्यक्षाशी बोलतो आणि पक्षात घेतो, असे दानवे यांनी यावेळी सांगितले.

दानवेंची फटकेबाजी...

या निवडणुकीत मतदारसंघात गेलो नाही. बूथ वर गेलो नाही. फक्त मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली. पण मी त्यातही गेलो नाही. कारण आजारी होतो. तरीही साडे तीन लाखांनी निवडून आलो. निवडणूक काळात फिरकले नाही तरी काही फरक पडत नाही. कारण काम केलेले असते,' असे म्हणत दानवे यांनी आपल्या निवडणूक विजयाचा फॉर्म्युला सांगितला.

काँग्रेसवर निशाणा..

'काँग्रेसला आता अध्यक्ष मिळत नाही. काँग्रेसची स्थिती सध्या वाईट आहे. भाजपला मात्र अच्छे दिन आले आहेत. मोदींची लोकप्रियता, अमित शहा यांची रणनीती आणि कार्यकर्त्यांचे कष्ट यामुळे हे शक्य झाले. दुसरीकडे, काँग्रेसचे नेते रणांगण सोडून पळू लागले. चांगले दिवस असताना घरातला अध्यक्ष आणि वाईट दिवस असताना कुणी पण अध्यक्ष करायला तयार होतात, असे म्हणत रावसाहेब दानवे यांनी गांधी परिवारावर टीका केली आहे.

पाहा VIDEO : काही सेकंदांमध्येच पत्त्यांप्रमाणे कोसळला पूल, अन्....

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 6, 2019 09:26 PM IST

ताज्या बातम्या