Lok sabha election 2019 राज ठाकरेंनी का सोडलं युद्धाचं मैदान? ही आहेत कारणं

'लोक राज ठाकरे को सुनने आते है, राज ठाकरे की नही सुनते.'

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Mar 17, 2019 07:21 PM IST

Lok sabha election 2019 राज ठाकरेंनी का सोडलं युद्धाचं मैदान? ही आहेत कारणं

मुंबई 17 मार्च : लोकसभेच्या राजकीय युद्धाला सुरूवात झालेली असतानाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युद्धात न उतरण्याची भूमिका घेतली आहे. राज ठाकरेंची ही भूमिका अनपेक्षीत नसली तरी कार्यकर्त्यांचं मनोबल खच्ची करणारं असल्याचं मत राजकीय निरिक्षकांनी व्यक्त केलंय. मनसेचा पाठिंबा आणखी कमी होत जाणार असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामुळे मनसेपासून कार्यकर्ते आणि मतदारही दूरावत जाणार असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

करिष्मा, आक्रमकपणा, वक्तृत्व आणि खंबीर नेतृत्व राजाकरणात आवश्यक असणारे हे  सर्व गुण राज ठाकरे यांच्याकडे असतानाही मनसे दिवसेंदिवस आपला पाठिंबा गमावत चालल्याचं दिसचं आहे. राज ठाकरे यांच्या धरसोड वृत्तीमुळेच मनसेची ही स्थिती झाल्याचं मत दैनिक लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक यदू जोशी यांनी व्यक्त केलंय.

यदू जोशी म्हणाले, राज ठाकरेंनी 2014 ची निवडणुकही लढवली नाही. मनसेची नाशिक आणि पुणे महापालिकेची सत्ता गेली. मुंबईत जे त्यांचे 6 नगरसेवक होते त्यातले बहुतांश नगरसेवक पक्ष सोडून गेले. मनसेचे जुन्नरचे एकमेव आमदार असलेले शरद सोनवणे यांनीही नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेचं मनसेचं विधानसभेतलं उरलं सुरलं प्रतिनिधीत्वही गेलं आहे.

राज ठाकरे यांच्या धरसोड वृत्तीमुळेच मनसेची ही अवस्था झाली. लोकसभेसाठी कार्यकर्त्यांचं जे नेटवर्क पाहिजे ते नेटवर्क आज मनसेकडे नाही त्यामुळे त्यांनी निवडणुक न लढविण्याचा निर्णय घेतला असावा असं मतही जोशी यांनी व्यक्त केलं. 2014 मध्ये त्यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला. नंतर त्यांच्यावर प्रहार करायला सुरूवात केली. शरद पवारांवर नेहमी टीका करणाऱ्या राज ठाकरेंनी पवारांची मुलाखत घेतल्यानंतर मैत्रीचं पर्व सुरू केलं. यामुळे कार्यकर्ते गोंधळात पडतात.

भाषणांसाठी राज ठाकरेंच्या भाषणाला गर्दी होते मात्र मत का मिळत नाहीत यावर जोशी म्हणाले, लोक राज ठाकरे को सुनने आते है, राज ठाकरे की नही सुनते.

Loading...

त्र्यंबकेश्वर मंदिरात पुजाऱ्यांमध्ये हाणामारी आणि शिवीगाळ, VIDEO कॅमेऱ्यात कैद


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 17, 2019 07:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...