प्रकाश आंबेडकर का लढत आहेत या दोन जागेंवरून?

प्रकाश आंबेडकर का लढत आहेत या दोन जागेंवरून?

दलित आणि मुस्लिम मतदार हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसचा हा मतदार दुरावण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई 26 मार्च : वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती न करता स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात अनेक ठिकाणी तिरंगी लढती होण्याची शक्यता आहे. या आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे सोलापूर आणि विदर्भातल्या अकोल्यातून निवडणूक लढविणार आहेत. याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

वंचित बहुजन आघाडीची सुरूवात पंढपूरमध्ये झालेल्या सभेत झाली होती. नंतर सोलापूरमध्ये झालेल्या प्रकाश आंबेडकर आणि ओवेसींच्या सभेचा प्रचंड गर्दी झाली होती. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांचं मोठं जाळही सोलापूर जिल्ह्यात निर्माण झालंय. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी सोलापूरातून लढण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता आहे.

आंबेडक मैदानात उतरल्याने त्याचा सर्वात मोठा फटका काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना बसू शकतो. सोलापूरमध्ये दलित मतदारांचं प्रमाण 3 तीन लाखांच्या आसपास आहे. तर लिंगायत मतदारांची संख्या 4 लाख आणि मराठा मतदारांची संख्याही तेवढीच आहे. दलित आणि मुस्लिम मतदार हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसचा हा मतदार दुरावण्याची शक्यता आहे.

अकोला हा गढ

काही वर्षांपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यात 'भारिप'चा प्रयोग केला होता. त्याला चांगलं यशही मिळालं होतं त्यामुळे महाराष्ट्रात हा 'अकोला पॅटर्न' म्हणून प्रसिद्ध झाला. अकोला हा प्रकाश आंबेडकरांचा गढ मानला जातो. आंबेडकरांना मानणारा मोठा वर्ग तिथे आहे. त्यामुळे कार्यकर्त्ये नाराज होऊ नये म्हणून प्रकाश आंबेडकर अकोल्यातूनही लढणार आहे. त्यांच्या या दोन्ही जागांवर सर्वांच लक्ष असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2019 04:39 PM IST

ताज्या बातम्या