तूरबंदीवर विरोधक गप्प का?

तूरबंदीवर विरोधक गप्प का?

तूरबंदीबाबत जसं सरकारला काही कळालेलं नाही तसं विरोधकांनाही फार काही लक्षात आलं नसल्याचं दिसतंय.

  • Share this:

संदीप राजगोळकर , कोल्हापूर

27 एप्रिल : तूरीबंदीबाबत गेल्या पाच दिवसांपासून आम्ही प्रत्येक घडामोड दाखवतोय. सरकार मात्र ढिम्म आहे. दिलेली 22 तारीख कायम आहे. तूरबंदीबाबत जसं सरकारला काही कळालेलं नाही तसं विरोधकांनाही फार काही लक्षात आलं नसल्याचं दिसतंय.

विरोधी पक्षातला कदाचित एकही नेता नाही ज्यांना शेतकऱ्यांबाबत माहिती नाही. एवढच काय आम्ही तुरीच्या बंपर उत्पादनाबाबत त्यांची चाचपणी करण्याचा प्रयत्न केला तर जवळपास प्रत्येक नेत्याला तूरीच्या लागवडीपासून ते बाजारापर्यंतची सगळी माहिती आहे. मग  प्रश्न असा आहे की विरोधकांनी तूरीवर आवाज का उठवला नाही? सरकारला वेळोवेळी जागं का केलं नाही?

सरकारनं जसं तूर उत्पादकांचं काहीच नियोजन केलं नाही तशीच काहीशी अवस्था विरोधकांचीही आहे. विरोधक अधिवेशन सोडून संघर्षयात्रेत उतरले. कर्जमाफीच्या मुद्यावर त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढलाय. तूरीनं विरोधकांना हुलकावणी दिली की शेती प्रश्नांचा त्यांना अंदाजच येत नाहीय.

कर्जमाफीचं ठिकंय, पण शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळवून दिला तर ना कर्जमाफी मागण्याची वेळ येईल ना देण्याची. हे जसं सरकारांना कळायला हवं तसंच विरोधकांना.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2017 03:50 PM IST

ताज्या बातम्या