राहुल गांधींचे फेव्हरेट उमेदवार पटोलेंना नागपूरवासीयांची 'नाना'

राहुल गांधींचे फेव्हरेट उमेदवार पटोलेंना नागपूरवासीयांची 'नाना'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर जाहीर टीका करत नाना पटोले यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

  • Share this:

नागपूर, 23 मे : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे महाराष्ट्रातले फेव्हरेट उमेदवार असलेले नाना पटोले यांना नागपूर लोकसभा मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी नाना पटोले यांचा पराभव केला आहे. गुरू विरूद्ध शिष्यामधील या लढतीमुळे नागपूरची ही लढत खूपच गाजली. लोकसभा निवडणूक 2014मध्ये नाना पटोल यांनी भंडारा गोदिंया मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि जिंकलीदेखील होती.

...म्हणून नाना पटोले फेव्हरेट

नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच कडवी टीका करून भाजपची साथ सोडली होती. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर जाहीर टीका करत नाना पटोले यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत, मोदी सरकारला शेतकऱ्यांची किंमत नाही', अशी जाहीर टीका करत नाना पटोले यांनी खळबळ उडवून दिली होती. मोदी सरकारच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळातील पहिलं बंड मानलं गेलं.

वाचा :SPECIAL REPORT : काँग्रेसचं 'प्रियांका कार्ड' का झालं फेल?

वायनाड लोकसभा मतदारसंघाचीही दिली जबाबदारी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पारंपरिक लोकसभा मतदारसंघ अमेठीसह केरळमधील वायनाड मतदारसंघातूनही लोकसभा निवडणूक लढवली होती. नवीन मतदारसंघात निवडणुकीसंदर्भात पक्षाची रणनीती आखण्यासाठी आणि मोर्चेबांधणीसाठीची जबाबदारी राहुल गांधी काही जणांच्या खांद्यावर दिली होती. यामध्ये महाराष्ट्रातून नाना पटोले यांचाही समावेश होता. नागपूर लोकसभा मतदारसंघातून पटोले जरी पराभूत झाले असले तरीही राहुल गांधी यांचा वायनाडमधून विजय झाला आहे. राहुल गांधींच्या वायनाडमधील विजयासाठी पटोले यांनीही प्रचंड मेहनत घेतली होती.

वाचा :VIDEO : जुनी जखम भरून निघाली, सुजय विखेंचा पवारांना सणसणीत टोला

विदर्भातील विजयी उमेदवार 

नागपूर लोकसभा मतदारसंघ - नितीन गडकरी(भाजप)

अकोला लोकसभा मतदारसंघ -  संजय धोत्रे (भाजप)

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ - अशोक नेते (भाजप)

वर्धा लोकसभा मतदारसंघ - रामदास तडस (भाजप)

भंडारा-गोंदियालोकसभा मतदारसंघ  - सुनील मेंढे (भाजप)

बुलडाणा लोकसभा मतदारसंघ - प्रतापराव जाधव (शिवसेना)

रामटेक लोकसभा मतदारसंघ - कृपाल तुमाने (शिवसेना)

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ - भावना गवळी (शिवसेना)

अमरावती लोकसभा मतदारसंघ  - नवनीत राणा (राष्ट्रवादी काँग्रेस)

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ  - सुरेश धानोरकर (काँग्रेस)

VIDEO : सेनेच्या वाघाला नमवणाऱ्या नवनीत राणांची पहिली UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 11:25 PM IST

ताज्या बातम्या