कोण आहे अभिजीत कटके?

अभिजीत कटके हा पुण्याच्या गणेश पेठेतल्या शिवरामदादा तालमीचा पैलवान आहे.अभिजीतचं वजन या घडीला तब्बल 122 किलो आहे

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 24, 2017 08:52 PM IST

कोण आहे अभिजीत कटके?

24 डिसेंबर: पुण्याजवळ भूगाव इथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत  अभिजीत कटके हा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. गेल्यावर्षी उपविजेता आणि यावर्षी विजेता ठरलेला अभिजीत कटके नक्की कोण आहे याची माहिती जाणून घेऊ या.

अभिजीत कटके  हा पुण्याच्या गणेश पेठेतल्या शिवरामदादा तालमीचा पैलवान आहे.अभिजीतचं वजन या घडीला तब्बल 122 किलो आहे. अभिजीतला अमर निंबाळकर, भरत म्हस्के आणि हणमंत गायकवाडांचं मार्गदर्शन लाभलं आहे. अभिजीतनं 2015 साली युवा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला होता. 2016 साली त्यानं ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीत कांस्यपदकाचा मान मिळवला होता.  अभिजीतला गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरीत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. पण जमखिंडीतल्या भारत केसरी या खिताबानं त्याच्यात नवा जोश भरला.

वयाच्या बाविशीतही अभिजीत एक परिपक्व पैलवान म्हणून ओळखला जातो.  त्याचा बचाव आधीपासूनच भक्कम होता. पण आता त्याच्या आक्रमणालाही धार चढल्याचं दिसून येत आहे.

आजचा विजेता अभिजीत आणि उपविजेता किरण भगत हे दोघं फक्त प्रतिस्पर्धी नाही तर चांगले मित्रही आहेत.  सोनीपतच्या राष्ट्रीय शिबिरात या दोघांची दोस्ती जमली. एकच वय आणि आवडनिवडही कुस्तीचीच. त्यामुळं त्यांच्यातली दोस्ती आणि कुस्तीही बहरली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 24, 2017 08:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...