'बैल हा धावणारा प्राणी आहे, की नाही?'

बैलसुद्धा घोड्यासारखाच धावू शकतो असा अहवाल प्राणी तज्ज्ञ समितीने दिलाय. हा अहवाल राज्य सरकार येत्या सात सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 4, 2018 06:53 PM IST

'बैल हा धावणारा प्राणी आहे, की नाही?'

मुंबई, 4 ऑगस्ट : बैलगाडी शर्यतींसमोर असलेला मोठा अडथळा आता दूर होणार आहे, असं दिसतंय. कारण आता खिलार जातीचा बैल वेगाने धावू शकतो असा अहवाल प्राणी तज्ज्ञ समितीने दिलाय. 'बैलाची शरीररचना घोड्यासारखी नसली, तरी बैलदेखील धावू शकतो. बैल हा घोड्याच्या वेगाने धावू शकत नसला, तरी प्रशिक्षण दिलेला खिलार जातीचा बैल वेगाने धावू शकतो', असं मत या अहवालात नमूद करण्यात आलंय.

हा अहवाल राज्य सरकार येत्या सात सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयासमोर सादर करणार आहे. या अहवालाचा दाखला देत घोड्यांच्या शर्यतीप्रमाणे बैलांच्या स्पर्धांना देखील परवानगी मिळावी, असा युक्‍तिवाद केला जाणार आहे. राज्यातील बैलगाडी शर्यतीवर उच्च न्यायालयाने आणलेल्या बंदीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती न दिल्याने गेल्या वर्षभरात राज्यात बैलगाडी शर्यत झालेल्या नाहीत.

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच दिलेल्या एका आदेशात बैल हा शर्यत लावण्यासाठी समर्पक प्राणी नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात याबाबतची भूमिका मांडताना बैल हा घोड्यासारखाच धावणारा प्राणी असल्याचे न्यायालयासमोर सिद्ध करण्याचे आव्हान राज्य सरकारच्या पशू, दुग्ध आणि मत्स्य विभागाने स्वीकारून प्राणीविषयक नऊ तज्ज्ञांची समिती काही महिन्यांपूर्वीच तयार केली होती. डॉ. डी. एम. चव्हाण, अतिरिक्‍त आयुक्‍त पशुपालन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने हा अहवाल दिला आहे.

या समितीमध्ये प्राणी तज्ज्ञ, प्राण्यांचे डॉक्‍टर, पशुसर्जन, प्राण्यांचे शरीरविज्ञान तज्ज्ञ अशा विविध तज्ज्ञांचा समावेश होता. या समितीने घोड्याच्या शरीराबरोबर बैलाच्या शरीराचाही शास्त्रशुद्ध अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. त्यासाठी अनेक संदर्भ, प्रत्यक्ष पाहणी, तज्ज्ञांशी चर्चेबरोबर तांत्रिक विवेचन यामध्ये करण्यात आले आहे.

या अहवालानुसार परदेशात पूर्वी घोडा शेतीच्या कामासाठीच उपयोगात आणला जायचा. मात्र औद्योगिक क्रांतीनंतर घोड्याऐवजी शेतीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर सुरू झाल्याने घोडा सार्वत्रिक शर्यतीसाठी वापरला जाऊ लागला. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

Loading...

घोडा, बैल, मेंढ्या, हरीण, काळवीटसारखे प्राणी धावण्यात तरबेज असतात. विशेषत: खूर असणारे प्राणी वेगाने धावतात; पण निश्‍चितच प्रत्येकाचा धावण्याचा वेग निरिनिराळा असू शकतो. त्यांची तुलना करणे योग्य नाही. बैलांच्या शरीराची रचना, पायांची लांबी आणि पोटाचा घेर यामुळे ते अत्यंत वेगाने धावू शकतात, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. सस्तन प्राणी असल्याने गायीच्या पोटाचा घेर हा बैलापेक्षा अधिक असतो. त्यामुळे गाय बैलाच्या वेगाने धावू शकत नाही.

राज्य सरकारने बैलगाडी शर्यतीसाठी तयार केलेले नियम हेदेखील पुरेसे असल्याचा शेरा या अहवालात मारण्यात आला आहे. प्राण्यांना इजा होत नसल्याची खात्री करून घेतल्यास बैलगाडी शर्यत घेण्यास हरकत नसल्याचे स्पष्टपणे या अहवालात म्हटले आहे.

या अहवालानुसार येत्या सात सप्टेंबर रोजी राज्य सरकार आपली बाजू सुप्रीम कोर्टात मांडणार आहे. प्राणी मित्र संघटनानी आक्षेप घेतल्यानंतर बैल घाऊ शकतो का नाही ह्यासाठीचा अभ्यास करण्यासाठी एक 9 सदसिय समिति नेमन्यात आली होती, या समितितल्या सदस्यानी 8 महीने अभ्यास करून हा अहवाल दिलाय.

दरम्यान, बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी पाठपुरावा करून विधयेक मांडणाऱ्या आपक्ष आमदार महेश लांडगे यांनी प्राणी समिति ने दिलेल्या अहवालाचं स्वागत केलंय आणि अहवालात नेमक काय काय म्हटल ह्याची माहिती देत हा अहवाल मान्य करून प्राणिमित्र संघटनांनी ही तो मान्य करावा असं आहवान केलंय.

काय आहे अहवालात?

- खिलार आणि उपजातीतले बैल धावण्यास योग्य

- बैल आणि घोड्याची तुलना करणं योग्य नाही

- सर्व प्राण्यांमध्ये धावण्याचे नैसर्गिक कौशल्य

- पण प्राण्यांना प्रशिक्षण गरजेचं

- प्रशिक्षण दिलं नाही तर बैल शेतातही काम करू शकत नाही

- बैलगाडा शर्यतींमुळे ग्रामीण भागात सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था मजबूत होण्यात मदत होते.

- सामान वाहून नेण्यासाठी किंवा धावण्यासाठी बैल व घोडा या प्राण्यांचा वापर होऊ शकतो.

- खिलार आणि त्याच्या उपजातीतले बैल हे धावण्यासाठी योग्य

प्राण्यांचा धावण्याचा वेग (प्रतितास मैल)

घोडा - 88

प्रशिक्षित बैल - 48

कळपातील बैल - 24

गाय - 40

 VIDEO : या धरणातलं पाणी इतकं हिरवं झालंच कसं?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 4, 2018 06:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...