S M L

डीएसके गायब की फरार?

उच्च न्यायालयात ठेवीदारांचे पन्नास कोटी रुपये भरण्याची तयारी दर्शवणारे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी मंगळवापर्यंत न्यायालयाकडे पैसे जमा केलेले नाहीत.पुणे पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून त्यांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही

Chittatosh Khandekar | Updated On: Dec 21, 2017 03:40 PM IST

डीएसके गायब की फरार?

पुणे, 21 डिसेंबर:  ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर उच्च न्यायालयात ठेवीदारांचे पन्नास कोटी रुपये भरण्याची तयारी दर्शवणारे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी मंगळवापर्यंत न्यायालयाकडे पैसे जमा केलेले नाहीत.  त्यामुळे  त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. कुलकर्णी यांचा पुणे पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून त्यांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे पत्नीसोबत फरार झाले असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

डी एस कुलकर्णी आणि त्यांची पत्नी पुण्याबाहेर असल्याचं समजतं आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.जवळपास सहा महिने त्यांनी ठेवीदारांचे पैसे परत केले नव्हते. अखेर कंटाळून ठेवीदारांनी तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणात त्यांनी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पुण्यातील न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन मंजूर करून दिलासा दिला. पण ठेवीदारांच्या एकूण रकमेपैकी पन्नास कोटी रुपये मंगळवापर्यंत (१९ डिसेंबर) जमा करण्याची मुदत उच्च न्यायालयाकडून त्यांना देण्यात आली होती. मात्र, कुलकर्णी यांनी मंगळवापर्यंत न्यायालयाकडे पन्नास कोटी रुपये जमा न केल्याने त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. कुलकर्णी यांनी न्यायालयात हमी देऊनही पैसे भरले नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून त्यांचा बुधवारी शोध घेण्यात आला.आता डीएसके  खरंच फरार झाले आहेत का हे लवकरच कळेल . तसंच ठेवीदारांच्या पैशांचं काय होणार हा ही एक मोठा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 21, 2017 08:38 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close