...आणि म्हणून पार्थ यांना पाहताच अजित पवार मेळाव्यातून निघून गेले

शरद पवार आणि अजित पवार तसे वेळेचे खूप पक्के आहेत. त्यामुळे मेळाव्यासाठी अजित पवार वेळेत उपस्थित झाले. पण पार्थ दीड तास उशिराने आले.

News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2019 12:06 PM IST

...आणि म्हणून पार्थ यांना पाहताच अजित पवार मेळाव्यातून निघून गेले

गोविंद वाकडे, प्रतिनिधी

पुणे, 01 एप्रिल : मावळमधील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित रविवारी कामगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी मुख्यमंत्री अजित पवार आणि  पार्थ पवार यांच्या नेतृत्वाखाली या कामगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या मेळाव्यात पार्थ पवार दीड तास उशिराने पोहचले.

शरद पवार आणि अजित पवार तसे वेळेचे खूप पक्के आहेत. त्यामुळे मेळाव्यासाठी अजित पवार वेळेत उपस्थित झाले. पण पार्थ दीड तास उशिराने आले. विशेष म्हणजे ज्यांच्या प्रचारासाठी हा मेळावा आयोजित केला गेला होता ते पार्थ पवार नियोजित वेळेपेक्षा उशिरा सभास्थळी पोहचले आणि ते बघून अजित पवार मेळाव्यातून निघून गेले.

त्यानंतर उशिरा आलेल्या पार्थ पवार यांनी यावेळीही भाषण करण्याचं टाळलं. याबद्दल त्यांना विचारलं असता, दादांचे विचार हे माझे विचार म्हणून बोललो नाही असा युक्तिवाद करत पार्थ यांनी वेळ मारून नेली. आणि विजय शिवतारेंनी केलेल्या टिकेला कार्यकर्ते उत्तर देतील अस सांगून ते निघून गेले.

कामगार मेळाव्याच्या निमित्ताने पार्थ पवार यांच्यासाठी जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील हेही आले होते.

Loading...

प्रचारासाठी पार्थ पवारांची धावपळ...!

उमेदवारी मिळाल्यापासून पार्थ पवार प्रचारासाठी कधी बैलगाडीमध्ये स्वार होतात, कधी ट्रेनमध्ये फिरतात तर कधी टपरीवर चहा पिताना दिसतात. कधी ते गाण्यावर ठेका धरतात तर कधी ते कार्यकर्त्यांसोबत धुलवड खेळताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या या स्टंटबाजीची सगळीकडे चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी दिली. पण त्यांना पहिल्या भाषणापासून टीकेचा सामना करावा लागत आहे. मराठी स्पष्ट बोलता येत नसल्याने पार्थ पवारांची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात आली होती. त्यानंतर एका धार्मिक कार्यक्रमात गाण्यावर धरलेला ठेकासुद्धा ट्रोलर्सच्या नजरेतून सुटला नाही.

पार्थ पवार यांनी सीएसएमटी ते पनवेल असा लोकलने प्रवास करून लोकांशी संवाद साधला. त्यानंतर रात्री पनवेलमध्येच मोहल्ला परिसरात पार्थ पवार प्रचारासाठी येणार होते. परिसरातील नागरिकांची भेट घेऊन ते मशिदीत जाणार होते.

मोहल्ला परिसरात जायला उशीर होत असल्याने पार्थ पवार यांनी चक्क पळत हा परिसर गाठल्याच सांगण्यात येत आहे. पार्थ पवार धावतानाचा व्हिडीओ पनवेल मध्ये वाऱ्या सारखा पसरल्यानंतर आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल झाला.

सभेसाठी उशीर झाला म्हणून पार्थ पवार पळत सभा ठिकाणी जात आहेत अशा आशयाचा मेसेज व्हायरल होतोय. परंतु मोहल्ला परिसरात पार्थ पवार यांची कुठलीही सभा नसल्याचं समोर येत असून हा निवडणूक पूर्व स्टंट असल्याचंही म्हटलं जात आहे. या स्टंटमुळे सोशल मीडिया वर पार्थ यांना पुन्हा एकदा ट्रोल करण्यात येतं असून निवडणुकीपर्यंत असे अनेक स्टंट पहायला मिळतील अशी टीका सोशल मीडियावर झाली.


SPECIAL REPORT: उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचं नक्की मनोमिलन झालंय?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 12:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...