राजा संकटात सापडलाय म्हणत इरफाननं घेतली हेलिकाॅप्टरकडे धाव

लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला जेव्हा अपघात झाला तेव्हा स्वतःचा जीव धोक्यात घालून मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी एक तरुण पुढं धावल्याचं समोर आलंय. इरफान शेख असं या तरुणाचं नाव आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: May 26, 2017 09:23 PM IST

राजा संकटात सापडलाय म्हणत इरफाननं घेतली हेलिकाॅप्टरकडे धाव

26 मे : लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला जेव्हा अपघात झाला तेव्हा स्वतःचा जीव धोक्यात घालून मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी एक तरुण पुढं धावल्याचं समोर आलंय. इरफान शेख असं या तरुणाचं नाव आहे. हेलिपॅडजवळच इरफानचं भंगारचं दुकान आहे.

ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं त्यावेळी सगळेच विरुद्ध दिशेला पळत सुटले. अगदी पोलीसही स्फोट होईल या भीतीनं मागं झाले. पण राजा संकटात सापडलाय असं म्हणत इरफाननं हेलिकॉप्टर जिथं पडलं तिथं धाव घेतली. हेलिकॉप्टरचा दरवाजा जोरात ओढला. मुख्यमंत्र्यांनी बाहेर येत आपण ठीक असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यानं इतरांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. इरफानच्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2017 09:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...