पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात 'व्हॉट्सअप पोस्ट' टाकली म्हणून, पोलीस निलंबित !

सरकारविरोधात आक्षेपार्ह लिखाण सोशल मीडियावर व्हायरल केल्यानं अहमदनगर जिल्ह्यात एका पोलिस कर्मचा-याचे निलंबन करण्यात आले आहे. रमेश शिंदे असे या निलंबित पोलिसाचे नाव आहे. अहमदनगरचे पोलीस अक्षीक्षक रंजनकुमार यांनी ही कारवाई केलीय. निलंबित पोलीस रमेश शिंदे हे काँग्रेसचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे अंगरक्षक म्हणून काम पाहत होते.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Oct 15, 2017 09:55 PM IST

पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात 'व्हॉट्सअप पोस्ट' टाकली म्हणून, पोलीस निलंबित !

अहमदनगर : सरकारविरोधात आक्षेपार्ह लिखाण सोशल मीडियावर व्हायरल केल्यानं अहमदनगर जिल्ह्यात एका पोलिस कर्मचा-याचे निलंबन करण्यात आले आहे. रमेश शिंदे असे या निलंबित पोलिसाचे नाव आहे. अहमदनगरचे पोलीस अक्षीक्षक रंजनकुमार यांनी ही कारवाई केलीय. निलंबित पोलीस रमेश शिंदे हे काँग्रेसचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे अंगरक्षक म्हणून काम पाहत होते. सरकारविरोधातलं लिक्षाण व्हायरल केलं म्हणून एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित केलं जाणं, ही राज्यातली कदाचित पहिलीच अशा प्रकारची कठोर कारवाई आहे. या कारवाईविरोधात सोशल मीडियावर तीव्र नासंपतीही व्यक्त होतेय. तर दुसरीकडे सरकारी कर्मचा-यांनी या अशा प्रकारच्या कारवाईची नक्कीच धास्ती घेतली असणार आहे.

निलंबित पोलीस कर्मचारी रमेश शिंदे हे संगमनेरमधील एका वॉटसअॅप ग्रुपचे सदस्य आहेत. दहा दिवसांपूर्वी पंतप्रधानाच्या नावाने त्यांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. याबाबत ग्रुपमधील काही जणांनी संगमनेर पोलीस स्टेशनला, तसेच पोलीस अधीक्षकांकडे पुराव्यासह तक्रार केली होती. याबरोबरच थेट पंतप्रधान कार्यालयात ही तक्रार करण्यात आली होती. याच तक्रारीची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

सरकारी सेवेत असताना सरकारविरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकणे चुकीचे असल्याचे कारण देत या पोलिसावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. पण सरकारविरोधात बोलणाऱ्या किंवा लिहिणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करून सरकार त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तर घाला घालत नाहीना,असाही वेगळा सूर सोशल मीडियावर उमटताना दिसतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2017 09:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...