Ground Report तेवरे धरण फुटले: काय झालं नेमकं काल रात्री Maharashtra | Ratnagiri| Tiware dam| Dam Breached | Chiplun

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालूक्यात असलेले तिवरे धरण फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 3, 2019 08:47 AM IST

Ground Report तेवरे धरण फुटले: काय झालं नेमकं काल रात्री Maharashtra | Ratnagiri| Tiware dam| Dam Breached | Chiplun

चिपळूण, 03 जुलै: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालूक्यात असलेले तिवरे धरण फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागात झालेल्या या घटनेत जवळ जवळ 25 जण बेपत्ता आहेत. धरणाच्या पायध्याजवळ असलेल्या भेंडवाडी (तिवरे गाव)तील 18 पैकी 13 घरांचे नुकसान झाले आहे. ही घटना नेमकी कशी घडली याबाबत जलसंधारण विभागाने माहिती दिली आहे.

मंगळवारी संध्याकाळी 5 च्या सुमारास धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली होती. रात्री 10 वाजता आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या whatsapp ग्रुपवर तिवरे धरण फुटल्याचा संदेश आला. त्यानंतर अधिकारी 12.30 पर्यंत घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार धरणाच्या मुख्य भिंतीस तडा जाऊन अंदाजे 9 ते 9.30च्या सुमारास भिंत फुटली. धरण फुटल्यानंतर त्यातील भराव 125 ते 150 मीटर पर्यंत वाहून गेला आहे. यामुळे तिवरे गावातील 13 घरे वाहुन गेली आहेत. गावातील 25 जण बेपत्ता आहेत.

तिवरे धरण फुटलं; 23 जण बेपत्ता, ही आहेत नावं

तिवरे धरणाची पाणीसाठवण्याची क्षमता 2 हजार 452 द.ल.घ.फु इतकी आहे. या धरणातील गाळ उपसण्याचे काम 2004मध्ये करण्यात आले होते. धरणाची लांबी 308 मीटर असून उंची 28 मीटर आहे.

चिपळूणमधील तिवरे धरण फुटले; 25 जण बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले

Loading...

जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणाचा काही भाग खचला होता आणि त्यासंदर्भात ग्रामस्थांनी तक्रार देखील दिली होती. यासंदर्भात पावसाळा सुरु होण्याच्या आधी काम करुन घेण्याचे आदेश दिले होते. हे काम 19 आणि 20 मे रोजी ग्रामस्थांच्या समोरच पूर्ण करण्यात आले होते, असे अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.

VIDEO: 'धरणाची केलेली डागडुजी योग्य नव्हती का? याची तपासणी करणार'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2019 08:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...