मुंबई, 10 जुलै : मी भाजपात जाणार, या बातमीत कोणतही तथ्य नसल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री आणि माझी मैत्री ही राजकारण विरहीत असून पक्षाने दिलेली जबाबदारी मी सक्षमपणे सांभाळत असल्याचंही राधाकृष्ण विखेपाटील यांनी म्हटलंय.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा कालपासून सुरू होती, मात्र स्वतः विखे पाटलांनीच त्याचं खंडण केलंय. परवा दिवशी शिर्डीत नगरपालिकेचा कार्यक्रम माझ्या मतदार संघात असल्याने मुख्यमंत्री आणि मी एकाच व्यासपीठावर आलो होतो. याचा अर्थ असा होत नाही की मी भाजपच्या वाटेवर आहे. आम्ही मैत्री केली म्हणून कोणतीही वेगळी भूमिका घेतलेली नाही, विरोधी पक्षनेता म्हणून आजवर केलेल्या कामावरती मी समाधानी असून सरकारला धारेवर धरण्यासाठी मी सक्षमपणे काम करत असल्याचंही विखे पाटलांनी स्पष्ट केलंय.
शिर्डीच्या कार्यक्रमात विखे पाटलांनी, याआधीच्या सरकारपेक्षा मला या सरकारमधील मंत्री अधिक जवळचे वाटत असल्याचं विधान मुख्यमंत्र्यांसमोरच केलं होतं. त्यावरून विखे पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या राजकीय चर्चेला जोर आला होता. पण स्वतः विखेपाटलांनीच भाजप प्रवेशासंबंधीचं वृत्त खोडून काढल्याने या राजकीय चर्चेला आता पूर्णविराम मिळालाय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा