उदयनराजे आणि राष्ट्रवादीत पॅचअप; साहेबांबद्दल मला नितांत आदर- उदयनराजे

गेली काही वर्षे पक्षापासून लांब असणारे साताऱ्याचे खा. उदयनराजे आज अचानक थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या गाडीतून पुणे टू सातारा असा प्रवास करून विश्रामगृहावर अवतरले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Oct 4, 2017 04:56 PM IST

उदयनराजे आणि राष्ट्रवादीत पॅचअप; साहेबांबद्दल मला नितांत आदर- उदयनराजे

सातारा, 4 ऑक्टोबर : गेली काही वर्षे पक्षापासून लांब असणारे साताऱ्याचे खा. उदयनराजे आज अचानक थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या गाडीतून पुणे टू सातारा असा प्रवास करून विश्रामगृहावर अवतरले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. उदयनराजेंच्या सततच्या पक्षविरोधी भूमिकेमुळे ते फारकाळ राष्ट्रवादीत राहणार नाहीत, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत होता. त्यात भर म्हणून विधान परिषद सभापती आणि शरद पवारांचे निकटवर्ती असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांच्या बरोबर असणाऱ्या टोकाच्या मतभेदांमुळे या गोष्टीला थोड्या प्रमाणात पुष्टीही मिळत होती पण आज अचानक राजे थेट पवारसाहेबांच्याच गाडीतून अवतरल्याने या सगळ्या राजकीय शक्यता पुन्हा खोट्या ठरल्यात. राष्ट्रवादीसोबतचे आपले सगळे मतभेद संपले असल्याचं स्पष्ट करतानाच खा. उदयनराजेंनी शरद पवारांबद्दल आपल्याला नितांत आदर असल्याचं म्हटलंय.

शरद पवार यांच्यासोबतच्या भेटीनंतर खा.उदयनराजेंनी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांच्यावरील खंडणीच्या आरोपांचंही साफ फेटाळले. ५० लाख रुपयांच्या भ्रष्टाचारांचे आरोप मी कधीही सहन करून घेणार नाही, दात टोकरून पोट भरणे, ही आमची संस्कृती नाही, हे करणारे कोणाचे बगलबच्चे आहेत ते सर्वांना माहिती आहेत यांचेच बगल बच्चे आज खंडणी आणि दरोड्याच्या गुन्हात आत आहेत, मी कोणतीही अपेक्षा न करता राजकारण करतो, मलाही आता या अशा घाणेरड्या राजकारणाचा कंटाळा आलाय, मलाही व्यक्तिगत आयुष्य आहे. जनतेची काळजी घेईल, असा मला एक माणूस दाखवा, मी लोकसभेचा अर्जही भरणार नाही, असे संतापजणक विधानही त्यांनी यावेळी केले.

भाजपाला शह देण्यासाठीच शरद पवारांनी राष्ट्रवादीमधले पक्षांतर्गंत मतभेद दूर करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. खा. उदयनराजेंची भेट घेऊन त्यांनी साताऱ्यातूनच याची सुरूवात केलीय, असं म्हणायला बराच वाव आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2017 04:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...