उजनीचा विसर्ग कमी झाल्याने पंढरपुरात पुराचा धोका टळला

उजनी धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग 70 हजारांवरून थेट 5 हजारांवर आणल्याने पंढरपुराचा धोका आता टळलाय. वीर धरणातूनही पाणी सोडणं आता बंद केल्यानं चंद्रभागेची पाणी पातळी आता कमी झालीय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Sep 16, 2017 11:11 AM IST

उजनीचा विसर्ग कमी झाल्याने पंढरपुरात पुराचा धोका टळला

पंढरपूर, 16 सप्टेंबर : उजनी धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग 70 हजारांवरून थेट 5 हजारांवर आणल्याने पंढरपुराचा धोका आता टळलाय. वीर धरणातूनही पाणी सोडणं आता बंद केल्यानं चंद्रभागेची पाणी पातळी आता कमी झालीय. तरीही परवापासून उजनीतून सोडण्यात आलेल्या 70 हजार क्युसेकच्या विसर्गामुळे चंद्रभागेच्या वाळवंटातली अनेक मंदिरं पाण्याखाली गेली होती.

परवा दिवशीपासून उजनी धरणाचा पाणीसाठा 109 टक्क्यांवर पोहोचल्याने धरणातून ७० हजार क्युसेक तर वीर धरणातून १३ हजार क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग भीमा नदीत करण्यात येत होता. यामुळे पंढरपुरातील भीमा नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागली होती.

पाण्याचा हा विसर्ग आणखी वाढवला गेला असता तर पंढरपुराला पुराचा मोठा धोका निर्माण झाला असता. या संभ्याव पुरामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला होता. तसेच नदीकाठी राहणाऱ्यांचे स्थलांतरही केले होते. पण पुणे जिल्ह्यात पावसाने उसंत घेतल्याने उजनीचा विसर्ग आता कमी करण्यात आलाय. तसंच वीर धरणाचा विसर्गही बंद करण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2017 11:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...