S M L

दुष्काळी कर्नाटकासाठी कोयनेतून पाणी सोडण्याचा सरकारचा निर्णय

कोयना धरणातून प्रती सेकंद 907 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीत केला जातोय.

Samruddha Bhambure | Updated On: Apr 12, 2017 11:56 AM IST

दुष्काळी कर्नाटकासाठी कोयनेतून पाणी सोडण्याचा सरकारचा निर्णय

12 एप्रिल : राज्यासह देशभरात उन्हाळ्याच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणचं पाणी आता तळ गाठायला लागलं आहे. त्यातच महाराष्ट्रानं कर्नाटकला पाणी द्यायचा निर्णय घेतला आहे. त्यावर तातडीनं अंमलबजावणीही केली गेलीय.

कोयना धरणातून प्रती सेकंद 907 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. एकूण 2.65 टीएमसी पाणी कर्नाटकला सोडण्यात येणार आहे.

कर्नाटकच्या काही भागात पाण्याचं दुर्भिक्ष्य निर्माण झालं आहे. त्यामुळे कोयनेतून पाणी सोडण्याची विनंती कर्नाटक सरकारनं केली होती. त्याचा मान राखत महाराष्ट्रानं पाणी सोडलं आहे. पण कोयनेच्या पाण्याच्या बदल्यात सोलापूर आणि सीमा लगतच्या भागत अलमट्टी मधून पाणी सोडण्याची तयारी कर्नाटकनं दाखवलीय. याचाच अर्थ असा की दोन्ही राज्यांनी पाण्याबाबत सहकार्याची भूमिका घेतलीय.मंगळवारी रात्री 10 वाजता विसर्ग सुरु केल्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीये. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील  नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2017 10:44 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close