सप्तश्रृंगी गडावर बोकडबळीच्या प्रथेवर अखेर बंदी

नाशिक जिल्ह्यातील वणीचा सप्तश्रृंगी गडावरील बोकडबळीची प्रथा आता बंद होणार आहे. जिल्हा प्रशासनानं बोकडबळी आणी त्यावेळी हवेत केला जाणारा गोळीबार या दोन्हीही प्रथा बंद करण्याचे आदेश देवस्थान समितीला दिले आहे.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Sep 16, 2017 02:02 PM IST

सप्तश्रृंगी गडावर बोकडबळीच्या प्रथेवर अखेर बंदी

नाशिक, 16 सप्टेंबर : नाशिक जिल्ह्यातील वणीचा सप्तश्रृंगी गडावरील बोकडबळीची प्रथा आता बंद होणार आहे. जिल्हा प्रशासनानं बोकडबळी आणी त्यावेळी हवेत केला जाणारा गोळीबार या दोन्हीही प्रथा बंद करण्याचे आदेश देवस्थान समितीला दिले आहे. गेल्या वर्षी या बोकडबळी वेळी झालेल्या दुर्घटनेनंतर हा निर्णय घेतल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. देवी दर्शनासाठी 505 पायऱ्या चढून भाविक गडावर जातात. त्या ठिकाणी नवसाचा बोकड बळी देण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. विशेष म्हणजे देवस्थान समितीचा सक्रीय सहभाग या बळी परंपरेत असतो.

गेल्या वर्षी मंदीर सुरक्षारक्षकाच्या रायफलमधून झालेलं मिसफायरमुळे 18 भाविक जखमी झाले होते. तसंच प्रचंड गर्दीमुळे भाविकांची चेंगराचेंगरी होऊन अनेकांना दुखापतही झाली होती. यामुळे यंदापासून ही प्रथाच मोडीत काढण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय.

आदिशक्तीचं रूप मानल्या जाणाऱ्या या देवीच्या दर्शनासाठी नवरात्रीत या गडावर लाखोंच्या संख्येनं भाविकांची गर्दी होते. त्यामुळे या बोकळबळीच्या प्रथेमळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता पोलीस प्रशासनाने ही प्रथा बंद व्हावी, अशी शिफारस जिल्हा प्रशासनाला केली होती. अखेर नियंत्रण समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2017 10:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...