पिचड पिता-पुत्रांच्या भाजप प्रवेशामुळे महादेव कोळी समाज नाराज, दिला हा इशारा

राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी आपले पुत्र वैभव पिचड यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता पिचड यांच्या भाजप प्रवेशामुळे महादेव कोळी समाज नाराज झाला आहे. महादेव कोळी समाजाचे नेतृत्त्व करणारे आणि शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी पिचड यांच्या भाजप प्रवेशाबाबीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2019 06:50 PM IST

पिचड पिता-पुत्रांच्या भाजप प्रवेशामुळे महादेव कोळी समाज नाराज, दिला हा इशारा

अहमदनगर, 31 जुलै - राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी आपले पुत्र वैभव पिचड यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता पिचड यांच्या भाजप प्रवेशामुळे महादेव कोळी समाज नाराज झाला आहे. महादेव कोळी समाजाचे नेतृत्त्व करणारे आणि शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी पिचड यांच्या भाजप प्रवेशाबाबीत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मधुकर पिचड यांनी महादेव कोळी समाजाला उध्दवस्त करण्याचे काम केले असून भाजपमध्ये राहून त्यांनी पुन्हा या समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर पिचड आणि त्यांच्या पुत्राला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अनंत तरे यांनी दिला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र दिले असल्याची माहिती अनंत तरे यांनी दिली आहे.

दुसरीकडे, एकविरा देवी मंदिर ट्रस्टच्या दानपेटीमधील केवळ 25 टक्के उत्पनाचा वाटा देवीच्या पदरात पडत होता. उर्वरित सर्व दान हे गुरव (पुजारी) यांना मिळत होते . अनंत तरे यांनी अनेक वर्षे याविरोधात लढा दिल्यानंतर त्यांच्या लढ्याला यश आले असून देवीच्या मंदिरात पुजारीकडून दनपेटीवर ठेवले जाणारे ताट कायमचे बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय सहधर्मादाय आयुक्तांनी दिलाल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.

आमदार वैभव पिचड यांना मतदारसंघातच धक्का..

अकोले तालुक्यातील आदिवासी बांधवांनी आमदार वैभव पिचड यांच्याविरोधात जनआक्रोश मोर्चा काढला. पिचड यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या वैभव पिचड यांना धक्का बसला आहे.

Loading...

आदिवासी नेते अशोक भांगरे यांच्या नेतृत्त्वात आदिवासी बांधवांनी अकोले येथे मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. पिचड यांच्यावर आदिसवासींनी जमीन बळकावण्याचा आरोप केला आहे. या जनआक्रोश मोर्चात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव सहभागी झाले होते. त्यामुळे वैभव पिचड यांची डोकेदुखी वाढली आहे. वैभव पिचड यांनी अकोले येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती. दरम्यान, पिचड पिता-पुत्राच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयामुळे नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडले आहे. तर कार्यकर्त्यांनीही पिचडांसोबत भाजपमध्ये जाणार असल्याचे सांगितले आहे.

VIDEO : आणखी आमदार संपर्कात, पण गिरीश महाजनांनी व्यक्त केली ही शंका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 06:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...