Good Morning : या आहेत आजच्या महत्वाच्या बातम्या

दिवसभरातील घडामोडींचा धावता आढावा

  • Share this:

अयोध्या दौऱ्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवरायांचा आशीर्वाद घेऊन अयोध्येला रवाना होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर उद्धव ठाकरे जाणार आहे. रामजन्मभूमीवर उद्धव ठाकरे महाराष्ट्रचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरीवरील माती एका कलशात भरून अयोध्येतील राम जन्मभूमीतील महंताना देणार आहे. शिवनेरी किल्यावरील माती राम जन्मभूमीत मंदिर निर्माणासाठी देणार आहेत.

नाशिकचे डॅशिंग आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या विरोधात 'मी नाशिककर' आज रस्त्यावर उतरणार आहेत. मुंढे यांची बदली रद्द करावी अशी मागणी ते सरकारकडे करणार आहेत. नाशिकच्या सामान्य जनतेसाठी त्यांनी खूप चांगलं काम केलं असल्यानं त्यांची बदली रद्द करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

मराठा आरक्षण - मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आजही विधानसभेत गोंधळ होण्याची शक्यता आहे. तातडीनं निर्णय घ्या असा आग्रह विरोधकांचा आहे. तर कायद्याच्या कसोटीवर निर्णय टिकला पाहिजे असं म्हणत सरकार प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतेय त्यामुळं संघर्ष होण्याची शक्यता आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात जावून आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेणार आहे. मुंबईतल्या काही प्रश्नांसदर्भात ते आयुक्तांची भेट घेणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात जावून आयुक्त अजॉय मेहता यांची भेट घेणार आहे. मुंबईतल्या काही प्रश्नांसदर्भात ते आयुक्तांची भेट घेणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानमध्ये आहेत. भिलवाडा आणि जयपूर मध्ये त्यांच्या जाहीर सभा होताहेत. या सभेत ते काँग्रेसवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. भाजपला राजस्थान कठिण जाणार असल्याचा अंदाज सर्वच संस्थांनी व्यक्त केल्यानं भाजपनं पूर्ण शक्ती पणाला लावली असून अनेक दिग्गज नेते राजस्थानात तळ ठोकून आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानमध्ये आहेत. भिलवाडा आणि जयपूरमध्ये त्यांच्या जाहीर सभा होताहेत. या सभेत ते काँग्रेसवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. भाजपला राजस्थान कठीण जाणार असल्याचा अंदाज सर्वच संस्थांनी व्यक्त केल्यानं भाजपनं पूर्ण शक्तीपणाला लावली असून अनेक दिग्गज नेते राजस्थानात तळ ठोकून आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2018 07:09 AM IST

ताज्या बातम्या