S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

दोन वर्षांत आपण मंदीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडू- शरद पवार

सामान्य माणसाचे जीवन व्यवसाय, व्यापार ,योग्य पद्धतीने जाण्याच्या दिशेने मदत होईल असे घडो असे पवार यांनी सांगितलंय.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 21, 2017 04:52 PM IST

दोन वर्षांत आपण मंदीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडू- शरद पवार

बारामती,21 ऑक्टोबर: गेला काही काळ आपल्याला देशाला भेडसावणाऱ्या मंदीच्या दुष्टचक्रातून आपण बाहेर पडू असं वक्तव्य माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केलंय. आज बारामती व्यापारी मर्चंट असोसिएशनच्या मेळाव्यात व्यापारांशी त्यांनी संवाद साधला.

'शेतीच्या क्षेत्रातसुद्धा सध्या नरमाईचं वातावरण पहायला मिळतंय. परंतु जमेची बाजू अशी आहे की पाऊस चांगला पडलाय. रब्बीचा हंगाम उत्तम झाला तर ,थोडी परिस्थिती बदलायला सुरवात होईल. आणि वर्षे दोन वर्षांत आपण महामंदीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडू असं शरद पवार म्हणाले. सामान्य माणसाचे जीवन व्यवसाय, व्यापार ,योग्य पद्धतीने जाण्याच्या दिशेने मदत होईल असे घडो असे पवार यांनी सांगितलंय.

पण ग्रामीण अर्थव्यवस्था उत्तेजित झाली नाहीतर बहुसंख्य लोकांच्या हातात पैसा जाणार नाही हा धोकाही त्यांनी व्यक्त केला. जोपर्यंत लोकांच्या हातात पैसा येऊन खरेदीशक्ती वाढत नाही तोपर्यंत बाकीच्या अर्थव्यवस्थेमधील वाढ पहायला मिळणार नाही असंही शरद पवार यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 21, 2017 04:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close