News18 Lokmat

डिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे

भाजप नेत्यांकडून युतीसाठी चाचपणी सुरू असतानाऔरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकला चलो रे चा नारा दिलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 24, 2018 10:50 AM IST

डिसेंबरमध्ये निवडणुका होतील ही फक्त चर्चा-उद्धव ठाकरे

औरंगाबाद, 20 एप्रिल : डिसेंबरमध्ये दोन्ही निवडणुका होतील अशी चर्चा आहे. पण जर तशी परिस्थिती आली तर आम्हालाही तयारी करावी लागेल असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तसंच  विधानसभा 2019 च्या निवडणुकीसाठी भाजपशी आम्ही युती करणार नाही हे आधीच स्पष्ट केलंय, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं सांगितलं.

भाजप नेत्यांकडून युतीसाठी चाचपणी सुरू असतानाऔरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकला चलो रे चा नारा दिलाय. जर डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणुका होणार असतील तर आम्हालाही आमच्या पक्षाची काय तयारी आहे हे पाहावं लागेल, याआधीच युती होणार नाही हे आमचं ठरलंय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

तसंच पावसाळी अधिवेशन मुंबई ऐवजी नागपुरात व्हावं, या भाजपच्या प्रस्ताव शिवसेनेकडून विरोध करण्यात आलाय. पावसाळी अधिवेशन मुंबईतच झालं पाहिजे, यावर शिवसेना ठाम असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. त्यामुळे आता पावसाळी अधिवेशनावरून भाजप आणि शिवसेना परत एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, युतीबाबतच्या शिवसेनेच्या ताठर भूमिकेला भाजपकडूनही प्रथमच थेटपणे प्रत्युत्तर देण्यात आलंय. शिवसेनेलाच जर युती नको असेल तर मग भाजपकडूनही युतीचा प्रस्ताव मांडण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका भाजपचे राज्यातले ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलीय तसंच पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्यास शिवसेनेचा विरोध कायम असेल तर मग बदलत्या आर्थिक वर्षानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशन हे कदाचित नागपूरला घ्यावं लागेल, अशी भूमिका आता सुधीर मुनगंटीवारांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना मांडलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2018 08:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...