जालन्यात पाण्याच्या टँकरने दोघांना चिरडले

बेशिस्त टँकर्सवर कारवाई करा, संतप्त गावकऱ्यांची मागणी

News18 Lokmat | Updated On: Jun 25, 2019 09:06 PM IST

जालन्यात पाण्याच्या टँकरने दोघांना चिरडले

जालना 25 जून : जालना येथे पाण्याच्या टँकरने धडक देऊन मोटारसायकलवरील दोघा जणांचा चिरडले. दोघांचा जागीच मृत्यू झाला, शहरातील मोतीबाग परिसरात दुपारच्या वेळी ही घटना घडली. मोतीबाग वरील रोडवर मोटरसायकलस्वार ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना टँकरची दुचाकी ला जोरदार धडक बसून हा अपघात घडला. अपघातात मृत्यू पावलेले दोघेही  अंबड तालुक्यातील गोंदी तांडा येथील रहिवासी आहेत. या अपघाता नंतर टँकर चालक फरार झालाय.

या प्रकरणी शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्यात टँकर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दुष्काळामुळे सर्व जिल्ह्यातच टँकरने पाणीपुरवढा केला जातो. त्यामुळे टँकरचा सुळसुळाट झालाय. यात अनेक टँकर्स हे अनाधिकृत आहेत. कमी पैशांवर ड्रायव्हर अशा टँकर्सवर नेमले जातात. त्यांना कुठलेही योग्य प्रशिक्षण नसते.

क्लिनरचं काम करतच ते ड्रायव्हिंग करायला लागतात. त्यामुळे अतिशय वेगात गाडी चालवणं आणि नियमांचं पालन न करणं यामुळे या गाड्यांच्या वाहतुकीला काहीही शिस्त राहात नाही. या बेशिस्तीच्या तक्रारी अनेकदा करण्यात आल्या मात्र त्यांच्यावर कारवाई होत नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी केलाय.

परळीत रेल्वे स्टेशनवर थरार

मराठवाड्यातल्या परळी रेल्वे स्थानकात आज थरार घडला. परळीहून अकोल्याला जाणाऱ्या रेल्वे इंजिनचा ताबा एका मनोरुग्णाने घेतल्याने खळबळ उडाली. ही गाडी फलाटावर उभी असताना हा माणूस इंजिनमध्ये जाऊन बसला. ही घटना समजल्यावर रेल्वे कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. गाडीचा ड्रायव्हर येऊन त्याला खाली उतरविण्याचा प्रयत्न करू लागला मात्र त्याला यश येत नव्हतं. शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि त्या मनोरुग्णाला बाहेर काढण्यात यश आलं. त्यामुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचले.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 25, 2019 09:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...